शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांत २ हजार बेकायदा बांधकामे

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत. त्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन हे बघ्याची भूमिका घेतात. या बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, त्यास न्याय न मिळाल्याने ‘रवींद्रन भगावो, तुकाराम मुंढे आओ’ अशी भूमिका आमदार गणपत गायकवाड यांनी घेली आहे. २७ गावांमधील दोन हजार बांधकामांवर कारवाई व्हावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गायकवाड म्हणाले. मंत्रालयात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात त्यांना पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. बेकायदा बांधकामे हटवण्यावर ठामपणे भूमिका घेणारे डॅशिंग प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचीच रवींद्रन यांच्या जागी नियुक्ती करावी, असे साकडे घालणार असल्याचे गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आयुक्त रवींद्रन हे गोडगोड बोलतात, पण ठोस कार्यवाही करण्याबाबत त्यांचे धोरण मुळमुळीत आहे. लोकशाही धाब्यावर बसवली जात असेल, तर त्या धोरणाचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला. आशेळे, द्वारली गावांतील बेकायदा बांधकामे वेळोवेळी आयुक्त तसेच प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे गायकवाड म्हणाले. यापैकी एका ठिकाणी १२ माळ्यांचे टॉवर कोणाच्या कृपाशीर्वादाने उभे राहते, असा सवाल केला. प्रभाग अधिकाऱ्यांचा यामध्ये पुढाकार जास्त असतो. त्यांच्या संगनमताशिवाय कुठेही बेकायदा बांधकामे उभीच राहू शकत नाही, असे ते म्हणाले. आरक्षित जागेवरील अतिक्रमण पाडले, असे उदाहरण निदान या शहरांत नाही. त्यामुळे मुंढे यांच्यासारखे अधिकारीच येथे हवेत, असा पुनरुच्चार आमदार गायकवाड यांनी केला. (प्रतिनिधी)