शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

नांदिवलीत २ कोटींचे रस्ते, नाल्याची काम होणार तरी कधी? - रवी म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:26 IST

नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बोट घेऊन दोन रुग्णांसह अन्य रहिवाश्यांना मदत करावी लागली.

डोंबिवली: नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बोट घेऊन दोन रुग्णांसह अन्य रहिवाश्यांना मदत करावी लागली. अनेकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेले. आयुष्यभराची पुंजी जमवून सर्वसामान्य नागरिक घर घेतात, आणि अशा पद्धतीने महापालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे नागरिकांचे नुकसान होते, ते योग्य नाही. नांदिवली भागात जेथे पाणी साचते त्या भागात चांगला रस्ता होण्यासाठी,आणखी एक नाला अशा विकासकामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात २ कोटींची विकास कामे या प्रभागासाठी जाहिर झाली आहेत, पण कामांचा मात्र पत्त नाही. नागरिकांचे नुकसान झाल्यानंतरच विकास काम करायची का? महापालिका प्रशासनाची ही कामाची पद्धत कुठली? अशी टिका करत नांदिवलीचे माजी सरपंच रवी म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली.रविवारी त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासमवेत श्री स्वामी समर्थ मठासमोरील गळया एवढ्या पाण्यामधून मदत कार्य देण्यास अडचणी येत असल्याचे अनुभवले. अखेरीस त्यांनी बोट मागवून नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजल्यापासून पाणी कमी होत नसल्याने अखेरीस ११ नंतर बोटीने त्यांनी ज्या नागरिकांना बाहेर यायचे होते त्यांना बाहेर काढले. तसेच रुग्णांनाही बाहेर काढले.नगरसेविका, ई प्रभाग समिती सभापती रुपाली रवी म्हात्रे यांच्या प्रभागात रस्ते, नाले आदी विकासकामांसाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा आराखडा देखिल तयार करण्यात आला असून कामाला सुरुवात का केली नाही? मार्च महिन्यापासून या ठिकाणी कामे व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. प्रत्यक्षात अधिका-यांना भेट, पाहणी करण्यात आली. परंतू तरीही कामे मात्र पुढे सरकली नाहीत त्यामुळेच यंदाही पूरस्थितीतून नागरिकांना जावे लागत असल्याचे म्हात्रे म्हणाले.गतवर्षी आणि यंदाही आयुक्त गोविंद बोडके यांनी येथील पाणी बघून गंभीर स्थिती असल्याचे सांगत पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने त्यांनीच तातडीने जेसीबी बोलावून दोन इमारतींच्या भिंती पाडण्याचे आदेश दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली होती. जेथे पाणी साचले होते तो भाग सखल असून २००५ च्या पूरामध्येही इथला भाग पाण्याखालीच होता. त्यावेळी स्वामींच्या मठातील सभामंडपाला पाणी लागले होते,ध्यानमंदिर पूर्ण पाण्याखाली होते. तेव्हापासून या ठिकाणच्या रस्त्याची विशेष काम झालेली नव्हती. आता महापालिकेत आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, पण पुन्हा स्थिती जैसे थेच असल्याने त्यांच्या घरांचे, सामानाचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. जे झाले ते झाले पण आता तरी महापालिकेने या प्रभागातील रस्ते, नाले यांसह मुलभूत काम तातडीने करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली. पुढील वर्षी तरी अशी गंभीर स्थिती नसावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुक्त सकारात्मक असले तरी अधिकारी मात्र कामात दिरंगाई, दुर्लक्षपणा करत असल्यामुळेच प्रभागातील विकास काम संथगतीने सुरु असल्याची टिका म्हात्रेंनी केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक