शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा आदेश डावलून सदनिकेची विक्री करून दोघांना १.९५ कोटींचा गंडा, बिल्डर सुरेश म्हात्रेविरुद्ध मोफांतर्गत कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: May 21, 2024 23:17 IST

Thane News: मोघरपाड्यातील कासारवडवलीमधील जागा मालकासोबत असलेल्या वादामुळे एसएसएम बिल्डर्सला सदनिका विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही सदनिकेची विक्री करून मुलुंडच्या आशिष बनसोडे यांच्यासह दोघांची एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची फसवणूक करणाºया बिल्डर सुरेश म्हात्रे (४९, रा. गुलमोहर, नौपाडा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी मंगळवारी दिली.

- जितेंद्र कालेकर ठाणे -  मोघरपाड्यातील कासारवडवलीमधील जागा मालकासोबत असलेल्या वादामुळे एसएसएम बिल्डर्सला सदनिका विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही सदनिकेची विक्री करून मुलुंडच्या आशिष बनसोडे यांच्यासह दोघांची एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची फसवणूक करणाºया बिल्डर सुरेश म्हात्रे (४९, रा. गुलमोहर, नौपाडा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी मंगळवारी दिली. म्हात्रे याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

एसएसएम डेव्हलपर्सचा मालक सुरेश म्हात्रे याचा कासारवडवलीतील मोघरपाडा येथील जागा मालकासोबत झालेल्या वादामुळे जागा मालकाने दिवाणी न्यायालयात ४ जानेवारी २०१४ रोजी दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या निकालानुसार म्हात्रे याला या जागेवरील सदनिकांची तिस?्या व्यक्तीला विक्री करण्यास मनाई आदेश न्यायालयाने दिला होता. तरीही, २३ फेब्रुवारी २०१६ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुलुंडचे रहिवासी आशिष बनसोडे (४४) यांच्याकडून ९९ लाख ८४ हजार ९५९ इतकी रक्कम घेतली. तसेच, सचिन महाजन यांच्याकडून ९५ लाख ८२ हजार ७४२ इतकी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. या दोघांचाही म्हात्रे याने विश्वास संपादन करून या दाव्याची बाब त्यांच्यापासून लपवून ठेवून त्यांच्याकडून ५३ लाख ५४ हजारांची रक्कम घेतली. त्यांनी फ्लॅटची मागणी करू नये, म्हणून त्यांना जून २०१९ ते डिसेंबर २०१९, असे सहा महिने दरमहा ४४ हजार २३१, असे तीन लाख नऊ हजार ६१७ इतका ईएमआय देऊन त्यांचे ५० लाख ४४ हजार ३८३ रुपये घेतले. मात्र, सदनिकेचा ताबा न दिल्याने यातील बनसोडे यांनी सदनिकेसाठी म्हात्रे याला दिलेले होमलोनचे व्याज ३४ लाख ४८ हजार ९२८ अधिक डाऊन पेमेंटचे १५ लाख ५४ हजार रुपये आणि त्यावरील १२ टक्के व्याज याप्रमाणे १४ लाख ९१ हजार ६४८ रुपये, असे मिळून ९९ लाख ८४ हजार ९५९ रुपये घेतले.

महाजन यांच्याकडून पेरी विंकल प्रोजेक्टमधील डी विंगमधील सदनिकेसाठी ९५ लाख ८२ हजार ७४२ रुपये घेतले. अशी या दोघांकडून एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची रक्कम घेऊन या रकमेचा अपहार करून दोघांचीही फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बनसोडे यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी फसवणुकीसह मोफा कायद्यांतर्गत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात एसएसएम डेव्हलपर्सचे मालक म्हात्रे यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने २१ मे २०२४ रोजी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी