शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१,८५५ मजुरांची दोन दिवसांत घरवापसी, मोफत प्रवासामुळे झाली १८ लाखांची बचत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 02:24 IST

आपल्या मुलाबाळांसह कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने परप्रांतीय गावाकडे निघाले होते. जवळपास दीड हजार किलो मीटरचा प्रवास असूनही अनेकजण रात्री बेरात्री हा रस्ता तुडवित जात होते.

- जितेंद्र कालेकर ठाणे : गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या मजुरांना एसटी आणि स्थानिक पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. दोन दिवसांत ठाणे आणि भिवंडीतून ७० एसटीतून एक हजार ८५५ परप्रांतीय मजूर मध्यप्रदेशच्या सीमेकडे रवाना झाले आहेत. मोफत प्रवासामुळे या परप्रांतीयांची सुमारे १८ लाखांची बचत होणार आहे.आपल्या मुलाबाळांसह कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने परप्रांतीय गावाकडे निघाले होते. जवळपास दीड हजार किलो मीटरचा प्रवास असूनही अनेकजण रात्री बेरात्री हा रस्ता तुडवित जात होते. शासनाने त्यांना राज्याच्या सीमेपर्यंत एसटीद्वारे मोफत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहर पोलिसांनी नावे नोंदवून त्यांच्यासाठी ठाणे आगारातून बसची सोय करुन दिली.अशी मिळाली एसटीकडून बससेवामजुरांसाठी ठाण्याच्या आनंदनगर चेकनाका येथून ६६ प्रवाशांना घेऊन तीन बस मध्य प्रदेश सीमेवरील शिरपूर येथे १० मे रोजी दुपारी ४ वाजता रवाना झाल्या. त्यापाठोपाठ माजिवडा सर्कल येथून १३२ प्रवाशांसह सहा बसेस, भिवंडीतील माणकोली नाका येथील ११ बसमधून २७५ प्रवासी धुळे जिल्ह्यातील शेंदवा येथे गेले. रांजणोलीतून २२५ प्रवाशांसह नऊ बस, तीनहातनाका येथून ५० प्रवाशांच्या दोन बस आणिखारेगाव नाका येथून १०० प्रवाशांच्या चार बस शिरपूरकडे रवाना झाल्या आहेत.दुसऱ्या दिवशी, ११ मे रोजीही ठाणे पोलिसांनी या परप्रांतीयांची नोंदणी करुन त्यांना बसेसची सुविधा दिली. दिवसभरामध्ये कापूरबावडी येथून ३५२ प्रवाशांसह आठ बस, कोपरीतून ६९ प्रवाशांसह तीन बस तर माणकोलीतून पाच बसमधून १२५ प्रवाशी गेले. याशिवाय, रांजणोलीतून सहा बस (१५६ प्रवासी), तीनहातनाका येथून पाच बस (११५), खारेगाव नाका तीन बसेस (६९), नौपाडा तीन बस (६९) आणि ५५ प्रवाशांच्या दोन बस राबोडीमधून मध्य प्रदेश सीमेकडे मार्गस्थ झाल्या आहेत.रविवारी ३५ बसमधून ८४५ तर मंगळवारी ३५ बसमधून १०१० अशा एक हजार ८५५ परप्रांतीयांना एसटीची मोफत प्रवासाची सुविधा मिळाली. एका प्रवाशाला किमान दोन हजार रुपये भाडे ट्रकचे लागणार होते. त्या हिशेबाने महाराष्टÑाच्या सीमेपर्यंत एक हजारांप्रमाणे १८५५ प्रवाशांच्या सुमारे १८ लाख ५५ हजारांची बचत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे