लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात आता कुठे स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्यांचा मृतांचा आकडा स्थिरावल्याचे दिसत असून आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या २५१ पैकी १८३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहे. मात्र, अद्यापही ५५ रुग्ण उपचारार्थ विविध शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६ हजार ४४५ रुग्णांनी फ्लू संदर्भात तपासणी केली आहे. त्यातील २९५ जण स्वाइन फ्लू संशयित म्हणून पुढे आले. त्यातील २५१ जणांना तो झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक १६२ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. त्यापाठोपाठ कल्याण व डोंबिवलीत- ५१, मीरा-भार्इंदर २६, नवी मुंबईत १०, जिल्हा सामान्य रुग्णालय -२ अशी त्यांची संख्या आहे. एकीकडे रुग्ण आढळून येत असताना, दुसरीकडे उपचार घेऊन रुग्ण घरीही परतणाऱ्यांची संख्या वाढती असल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे.
स्वाइन फ्लूचे १८३ रुग्ण घरी परतले
By admin | Updated: July 8, 2017 05:46 IST