शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रंगवल्ली रेखटाणार १८००० चौ फुटांची भव्य सुलेखनीय महारांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:32 IST

ठाणे : गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १६ मार्च रोजी १०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून पारंपारिक चिन्हे, प्रतिके यांचा उपयोग करुन भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. रांगोळीमध्ये ‘अक्षर सुलेखन’ (कॅलिग्रॅफी) हा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहयला मिळणार आहे.    या सुलेखनातून उपनिषदातील काही छराविक शांतीमंत्र लिहीण्यात येणार आहेत. लौकिक सुखांकडून पारलौकिकतेकडे ...

ठळक मुद्देरंगवल्ली रेखटाणार १८००० चौ फुटांची भव्य सुलेखनीय महारांगोळी१०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून साकारणार भव्य रांगोळी पोट्रेट रांगोळी हे या सोहळ््याचे विशेष आकर्षण ठरणार

ठाणे : गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १६ मार्च रोजी १०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून पारंपारिक चिन्हे, प्रतिके यांचा उपयोग करुन भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. रांगोळीमध्ये ‘अक्षर सुलेखन’ (कॅलिग्रॅफी) हा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहयला मिळणार आहे.    या सुलेखनातून उपनिषदातील काही छराविक शांतीमंत्र लिहीण्यात येणार आहेत. लौकिक सुखांकडून पारलौकिकतेकडे जाण्याचा मार्ग चितारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पारंपारिक चिन्हांचा जोडीला वळणदार नक्षीचा अंतर्भाव आकर्षक ठरणार आहे. यंदाच्या वर्षी व्यक्तिचित्र रांगोळी म्हणजेच पोट्रेट रांगोळी हे या सोहळ््याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. रंगरसिक - रंगवल्ली परिवारातर्फे साकारण्यात येणाºया या अभूतपुर्व सोहळ््याचे उद्घाटन शुक्रवार १६ मार्च रोजी सायं. ७ वा. होणार असून पुढील तीन दिवस म्हणजेच १९ मार्च पर्यंत रसिकांना या कलाविष्काराचा आनंद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे व्यक्तिचित्र रांगोळ््यांचे प्रदर्शन १४ मार्च ते १९ मार्च हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. पारंपारित रांगोळीप्रमाणेच व्यक्तिचित्र रांगोळी, रांगोळीमध्ये सुलेखन इत्यादी विविध प्रकारांचे प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातन देणारी ही संस्था केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रबाहेरही कार्यरत आहे. गेली १६ वर्षे अखंड तप करुन परिपक्व झालेली ही संस्था विविध उपक्रमांचे आयोजन करुन अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात आहे असे आयोजक वेदव्यास कट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई