शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यात १८ रुग्णांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 07:25 IST

१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून, हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य अनिल परब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. 

१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातील शिफारशींनुसार कारवाई करण्यात येईल,  असे सामंत यांनी स्पष्ट केले.

 दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सात व छत्रपती संभाजीनगर येथे १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू उपचाराअभावी झाला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने कळविले आहे. 

‘रिक्त पदे तातडीने भरा’    राज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरीत्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.  रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्णसेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल