शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगताना पसार झालेल्या आरोपीस १७ वर्षांनंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:13 IST

संचित रजेवर बाहेर आल्यावर आपले अस्तित्व लपवत होता. अशाप्रकारे १७ वर्षानंतर मात्र, त्याची ओळख पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला थेट परराज्यात बेड्या घातल्या आहेत.

ठळक मुद्देअस्तित्व लपवून राहत होता उत्तर प्रदेशात ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

ठाणे : खुनाच्या गुन्ह्यामध्ये मूळचा उत्तर प्रदेशमधील वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंह (४८) याला ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, तो पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. याचदरम्यान, तो १४ दिवसांच्या संचित रजेवर सुटल्यावर पुन्हा कारागृहात हजर झालाच नव्हता. तेव्हापासून पसार असलेला वेदप्रकाश याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने बुधवारी तब्बल १७ वर्षांनंतर उत्तर प्रदेश येथून अटक करून त्याला वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.स्थावर मालमत्तेच्या वादावरून ठाण्यातील करवालोनगर येथे राहणारे रामनारायण खरबानी सिंग यांच्यावर ५ डिसेंबर १९९४ रोजी प्रयागसिंग भारती सिंग, वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंग आणि अशोककुमार उपेंद्र सिंग या त्रिकुटाने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी करून रामनारायण यांना जीवे मारले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर १९९७ साली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तसेच एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली होती. त्या गुन्ह्यात आरोपी वेदप्रकाश हा पुणे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. १८ जून २००१ रोजी पुणे पश्चिम विभागाचे कारागृह उपनिर्देशक यांच्या आदेशानुसार, तो १४ दिवसांच्या संचित रजेवर सुटला होता. तेव्हापासून तो संचित रजेवरून परत कारागृहात हजर न झाल्याने अखेर २०१३ साली कारागृह पोलीस कर्मचारी हेमंत शिवाजी कोरडे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.दरम्यान, २००१ पासून पसार असलेला वेदप्रकाश हा आपले अस्तित्व लपवून उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे राहत असल्याची ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी मिळाली होती. त्यानुसार ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, पोलीस नाईक संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड यांचे पथक तातडीने उत्तर प्रदेशला रवाना झाले. तसेच त्याच्या शोधासाठी या पथकाने उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सची मदत घेऊन त्याला अटक केली. तसेच २०१३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याचा ताबा वर्तकनगर पोलिसांकडे दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे