शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण एसटी डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:08 IST

दाटीवाटीने राहतात ६० जण, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठाणे : कल्याण : कल्याण एसटी डेपोतील १७ वाहक-चालक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, डेपो प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे ३०० कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेपोच्या विश्रांतीगृहाची क्षमता २० कर्मचाºयांची असताना तेथे ६० जण दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे डेपोत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना कसा नियंत्रणात येणार, असा सवाल केला जात आहे.

डेपोतील कर्मचारी भगवान आवटे म्हणाले, डेपोतील विश्रामगृहात ६० कर्मचारी दाटीवाटीने एकमेकांच्या शेजारी विश्रांती घेतात. तेथे स्वच्छताही नसते. आतापर्यंत १७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी आणखी एकाला लागण झाली. शनिवारीही एका कर्मचाºयाला ताप आला आहे. कर्मचाºयांना येथे सॅनिटायझर, मास्क दिले जात नाही. विश्रांतीगृहाचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. केवळ पांढरी पावडर मारून स्वच्छता केल्याचे भासविले जात आहे. पाच महिन्यांपासून कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न कर्मचाºयांपुढे आहे.

कर्मचारी अतुल अहिरे म्हणाले, डेपोत जवळपास ३०० कर्मचारी आहेत. यापूर्वी ७० पेक्षा जास्त फे ºया चालविल्या जात होत्या. कोरोनाकाळात केवळ सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी बस सुरू होत्या. तेव्हा जीवाची पर्वा न करता कामगारांनी काम केले. मात्र, त्यांना कोरोनाकाळातील १२७ दिवसांचा पगार अद्याप दिलेला नाही. काही कर्मचाºयांना पाच महिन्यांचा पगार मिळालेला नाही. प्रशासनाकडून केवळ चालढकल केली जात आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

हजर असलेल्या ‘त्या’ १८ टक्के कर्मचाºयांना दिला पगार

च्डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड हे शनिवारी सुटीवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, उपस्थित अधिकाºयांनी सांगितले की, कोरोनाकाळात मुंबई, ठाणे आणि पालघर डेपोतील कर्मचाºयांना कामावर हजर राहण्यास सांगितले होते.च्त्यापैकी केवळ १८ टक्केच कर्मचारी हजर होते. त्यांना पगार दिला आहे. अन्य कर्मचाºयांचा पगारही वरिष्ठांच्या आदेशानुसार दिला जाईल. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, हे स्पष्ट केले नाही.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस