शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विरोध डावलून १६० कोटींचा आपला दवाखाना प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:58 IST

ज्यांना हवे त्यांच्याच प्रभागात आरोग्य केंद्र; आयुक्तांचे स्पष्टीकरण

ठाणे : किसननगर आणि कळवा येथे सुरू केलेली आपला दवाखाना ही संकल्पना पूर्णत: फोल ठरली असल्याचा आरोप करून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून सुमारे १६० कोटी रु पयांची उधळपट्टी करण्याचे कारण काय, असा सवाल करत शुक्रवारच्या महासभेत विरोधकांनी आपला दवाखाना या संकल्पनेच्या खर्चावर आक्षेप घेतला. अखेर, आयुक्तांनी ज्या नगरसेवकाला आपला दवाखाना नको असेल, त्यांच्या प्रभागात ही योजना राबवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही विरोधकांनी या योजनेला विरोध कायम ठेवला. अखेर, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा विरोध नोंदवून गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.शहराच्या विविध भागांत एकूण ५० आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना’ (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य केंद्र सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे ते एक असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या आरोग्य केंद्रांचा वापर करणाऱ्यांची लोकसंख्या पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंद्रे आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटी रु पयांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रु ग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्याच सुविधांसाठी ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु पये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसननगर आणि कळवा येथे राबवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. त्यातही प्रस्ताव मंजूर होण्याआधीच निविदा काढल्याचा आरोपही त्यांनी केला.बाळासाहेब ठाकरेआरोग्यदायी योजना नाव द्यायापूर्वी ज्या दोन ठिकाणी हे प्रयोग राबवण्यात आले होते, ते यशस्वी झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांनी दिले. मागील तीन महिन्यांत या आरोग्य केंद्रांमधून आठ हजार रुग्णांवर उपचार झाल्याचेही त्यांनी सांगितले.दुसरीकडे राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या संकल्पनेला आमचा विरोध नसून त्यावर केल्या जाणाºया खर्चावर आक्षेप असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या मुद्याला हात घालून ही योजना यशस्वी असून चांगली असल्याचे सांगितले.त्यामुळे या योजनेचे यापुढे बाळासाहेब ठाकरे आरोग्यदायी योजना असे नामकरण करण्यात यावे आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर, विरोधकांचा विरोध वाढतच असल्याचे दिसून आले.जेवढ्या रुग्णांवर उपचार, तेवढेच बिलआयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत माहिती देताना केवळ आपल्या देशातच नाही, तर प्रगत देशातही आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. डॉक्टरांची संख्याही प्रत्येक ठिकाणी कमी आहे. ठाण्यात तर कळवा हॉस्पिटलच्या माध्यमातून रोजच्या रोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.ही योजना गरिबांसाठी असून त्याचा खरा उपयोग त्यांनाच होणार आहे. तसेच ज्या संस्था हे उपक्रम चालवणार असतील, त्यांच्याकडे जेवढे रुग्ण उपचार घेणार आहेत, तेवढेच बील त्यांना अदा केले जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा पुन्हा विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.खर्चाच्या मुद्यावर जो काही आक्षेप घेण्यात आला आहे, त्यावर जर एखादी दुसरी संस्था यापेक्षा कमी खर्चात ही संकल्पना राबवण्यास तयार असेल, त्यालासुद्धा हे काम देता येऊ शकते. तशी संस्था लोकप्रतिनिधींनी सुचवल्यास त्याचेही स्वागत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका