शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये मासेमारी करण्यास गेलेला 16 वर्षाचा मुलगा बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 14:29 IST

भाईंदर पश्चिमेस असलेल्या चौक समुद्र किनारी भावांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला 16 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे.

मीरारोड -  भाईंदर पश्चिमेस असलेल्या चौक समुद्र किनारी भावांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला 16 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस मात्र भरती असल्याने बुडालेल्या मुलाचा शोध घेणे अवघड झाले आहे . सध्या मासेमारी बंद असली तरी किनाऱ्याला पाण्याच्या प्रवाहात येणारे मासे मिळत असल्याने दोन काठ्यांना जाळे लावून मच्छीमार हे मासेमारी करत असतात. घरच्या पुरते मासे यातून मिळत असतात. तर काहीजण लहान बोट घेऊन जवळपास मासेमारी करतात. भाईंदरच्या उत्तनजवळील चौक बंदरात राहणारा ऑज्वल अजय माल्या (१६) हा आपल्या लहान भाऊ एमोस ( १४ ) व एलिस्टन  (१२) यांच्यासोबत सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी चौक समुद्र किनारी गेला होता. दोन काठ्यांना जाळे लावून मासेमारी करत होते. 8.45 वाजण्याच्या सुमारास मासे पकडून झाल्यावर ऑज्वल व एलिस्टन पाण्यातून बाहेर येत होते. गुडघाभर पाणी असताना अचानक ऑज्वल पाण्यात पडला व दिसेनासा झाला. 

त्याचा किनाऱ्यावर शोध घेण्यात आला. पालिकेचे अग्निशमन दलाचे जवानदेखील आले. पण त्यांच्याकडे बोट नसल्याने त्यांनी किनाऱ्यावर व परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. मोटर बोटीच्या सहाय्याने काही काळ शोध घेतला. परंतु मोठी भरती असल्याने पाण्याचा प्रवाह वेगात होता. जेणे करून शोधकार्य थांबवण्यात आले. समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूच्या कोळीवाड्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळी भरती कमी झाली की पुन्हा शोध कार्य सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.  ऑज्वल हा मच्छीमार कुटुंबातीलच असल्याने त्याला पोहता येत होते . नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला होता.