शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार जि.प. कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार

By admin | Updated: April 18, 2016 00:21 IST

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी

- सुरेश लोखंडे,  ठाणे

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी अनेकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार समायोजनेखाली पालघरमध्ये बदल्या होणार आहेत. बिंदू नामावलीनुसार होणाऱ्या या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे- पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संख्या समान ठेवण्यासाठी राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र शासन निर्णय जारी केला आहे. विभाजन होऊनही आदिवासी, दुर्गम भागातील बदल्यांचे संकट मात्र पाठ सोडत नसल्यामुळे शिक्षकांसह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. यासाठी १ जानेवारी २०१५ ची अंतिम ज्येष्ठतासूची या समायोजन बदल्यांसाठी प्रमाणभूत मानली आहे. प्राप्त माहितीनुसार पालघर जिल्ह्यातून सुमारे एक हजार ४११ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येण्यास पात्र ठरत असल्याचे बोलले जात आहे. तर, ठाणे जिल्ह्यातून केवळ सात शिक्षक पालघरमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. परंतु, या सक्तीच्या बदल्यांना पात्र ठरणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ठाणे जिल्हा परिषदेने गुप्त ठेवली आहे. मात्र, एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या दरम्यान या बदल्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.या बदल्यांसाठी बिंदू नामावलीचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्यात सेवाज्येष्ठता यादी बदल्यांसाठी पात्र धरली जाणार आहे. यानुसार, होणाऱ्या बदल्यांमधून अपंग कर्मचारी, दुर्धर व गंभीर आजाराने पीडित कर्मचारी, ५३ वर्षे व त्यावरील वयाचे कर्मचारी आणि शासकीय सेवेतील पतीपत्नी एकत्रीकरण आणि विकल्प असलेल्यांना सवलत देण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित बदली झालेल्या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी, शिक्षक यांची प्रतीक्षा यादी तयार होऊन भविष्यात त्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली करणे शक्य होणार आहे.रिक्त जागी दोन्ही जिल्हा परिषदांना भरती करता येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. पण, दोन्ही जिल्हा परिषदांचे कर्मचारी, शिक्षक संख्या समान ठेवण्यासाठी काढलेला शासन निर्णय हा अन्यायकारक असल्याची चर्चा ठाणे जिल्हा परिषदेत ऐकायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांसह शिक्षकांमध्ये बदल्यांचा विषय जोरदारपणे चर्चीला जात असून यादीत आपले नाव येणार नाही, यासाठीदेखील काहींचे प्रयत्न सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे.