शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील १६ एसआरए योजना वगळल्या

By अजित मांडके | Updated: February 22, 2024 21:02 IST

हजारो झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या १६ झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या. आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती. अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या. शेकडो कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती. अशावेळी राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली. ठाण्यात क्लस्टरचे ४४ आराखडे तयार करण्यात आले. यातील किसननगर क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही. या योजनेत एस आर ए योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला. एसआरए योजना ठप्प झाल्याने  हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती.

एस आर ए योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित १८ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा, अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी राज्य शासनाने अध्यादेश काढून सन २०२२ पर्यंत सुरू असलेल्या एसआरए योजनांना क्लस्टरमधून वगळण्यात आले.

या निर्णयाबाबत आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच पुढील काळात सन २०२२ नंतर सुरू झालेल्या उर्वरित काही योजनांनाही वगळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव साई चैतन्य-बी केबिन नौपाडा, महाराष्ट्र दर्शन-शेलारपाडा, विष्णू-मंजुळा ठाणेकर, पवनपुत्र-सिद्धार्थ नगर कोपरी, दत्तकृपा-कोपरी कॉलनी, श्री जय अंबे -करवालो नगर, शिव औदुंबर-लोकमान्य नगर, फर्नांडिस हाऊस-धोबी आळी,  साई दर्शन-नुरीबाबा दर्गा मार्ग,  सिद्धी विनायक-वीर सावरकर नगर, श्री स्वामी एकता रहिवासी-चराई, मार्क्स नगर-राबोडी आदी १६ ठिकाणी एसआरए योजनांची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :thaneठाणे