शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१५४८ बालके तीव्र कुपोषित; ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:32 IST

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांगीण सक्षम असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आजही सुमारे एक हजार ५४८ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांगीण सक्षम असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आजही सुमारे एक हजार ५४८ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड झाले आहे.कुपोषित बालकांमध्ये ७९ बालके तीव्र कुपोषित, तर ९७१ बालके मध्यम कुपोषित आहेत. याशिवाय १५९ बालके दुर्धर आजाराशी झगडत आहेत. याशिवाय एक हजार ५४८ बालके अति कमी वजनाची आढळून आली. त्यांच्यावर वेळीच दैनंदिन उपचारासह पोषण आहाराची मात्र न दिल्यास ते कुपोषणाच्या संख्येत वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या तीव्र कमी वजनाच्या बालकांच्या तुलनेत सुमारे आठ हजार ६०१ बालके मध्यम वजनाची आढळली आहेत. याकडे गांभीर्याने विचार न केल्यास ठाणे जिल्ह्याचादेखील मेळघाट होण्यास विलंब लागणार नसल्याचे बोलले जात आहे.बालकांच्या तुलनेतील कुपोषणाची टक्केवारीकुपोषित बालकांना अतिरिक्त आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने १५ लाखांच्या मूळ तरतूदीत वाढ करून घेतली. सुमारे २२ लाख ६० हजारांनी वाढीव तरतूद केलेली दिसून येत आहे.दरवर्षी लाखोंच्या तरतूद करूनही जिल्ह्यास लागलेला कुपोषणाचा कलंक मात्र पुसल्या जात नसल्याची बाब गंंभीर आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील एक लाख १२ हजार ४०० बालकांच्या तुलनेत ०.१ टक्के बालके तीव्र कुपोषणाचे तर ०.९ टक्के बालके मध्यम कुपोणाचे असल्याचे सांगून जिल्हा यंत्रणा आपले कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे पटवून देण्यात आघाडीवर दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणे