शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसाठी १,५००, तर धुळ्यासाठी १,००० भाडे; खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची बससेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 23:36 IST

ऐन दिवाळीत प्रवासभाड्यात वाढ ; प्रवाशांना भुर्दंड

 - जितेंद्र कालेकर  ठाणे : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवासी भाड्यामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे भरडलेल्या प्रवाशांवर सणासाठी आपले गाव गाठणेही मोठे दिव्य झाले आहे. एरव्ही ६०० रुपये असलेले कोल्हापूरचे भाडे आता दीड हजार रुपये झाले आहे. धुळेकरांना सातशेऐवजी आता एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. एसटीच्या साध्या आणि शिवशाही (वातानुकूलित) बसपेक्षाही हे भाडे जास्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठाण्यातून कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक, शिर्डी आणि धुळ्याकडे जाणारा मोठा प्रवासीवर्ग आहे. सध्या शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. गेले सात महिने लॉकडाऊनमध्ये अडकलेले चाकरमानी आता आपापल्या गावी जात आहेत. त्यातही दिवाळी सण असल्यामुळे एसटीसह खासगी बसेसलाही प्रवाशांची मोठी मागणी आहे. 

एसटीच्याही सध्या मर्यादित गाड्या असल्याने त्यांचे आरक्षण मिळणे कठीण होते. शिवाय, लांब पल्ल्यांसाठी एसटीच्या वातानुकूलित आणि लक्झरी बसेसही कमी आहेत. त्यामुळेच प्रवासी खासगी बसेसचा आधार घेतात. मधल्या काळात ट्रॅव्हल्स बसलाही प्रवासी नव्हते. डिझेलचेही भाव वाढले. शिवाय, कर्जाचे हप्ते, टोलमध्येही झालेली वाढ अशा सर्व पार्श्वभूमीवर प्रवास भाड्यात वाढ करावी लागल्याचे ट्रॅव्हल्सचालक सांगतात. 

टॅग्स :thaneठाणे