शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांवर १५ टक्के करबोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:37 IST

ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसली तरी २०१७ मध्ये केलेल्या ठरावात ३४ टक्के करवाढीचा प्रस्तावाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यावरूना मागील महासभेत खडाजंगी झाल्यावर हा ठरावच रद्द करण्यासंदर्भातील नवा ठराव झाला होता.

ठाणे  - ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसली तरी २०१७ मध्ये केलेल्या ठरावात ३४ टक्के करवाढीचा प्रस्तावाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यावरूना मागील महासभेत खडाजंगी झाल्यावर हा ठरावच रद्द करण्यासंदर्भातील नवा ठराव झाला होता. परंतु, महासभेच्या या ठरावाला केराची टोपली दाखवून आता ही करवाढ ३४ टक्के नाही तर १५ टक्के असणार आहे. त्यानुसार मालमत्ताकराच्या जललाभ कर, मल:निसारण कर, मल:निसारण लाभ कर आणि रस्ता कराची वसुली प्रशासन करणार आहे.मागील महिन्यात झालेल्या महासभेत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या ३४ टक्के करवाढीच्या विरोधात प्रस्तावाची सुचना मांडली होती. परंतु, प्रत्यक्षात हा ठरावच झाला नसल्याचे मत विरोधकांनी मांडले होते. विशेष म्हणजे परिवहनच्या अर्थसकंल्पात तो घुसवून त्याला मंजुरी घेतल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. म्हस्के यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या सुचनेनुसार ही करवाढ १० टक्के करावी असे सुचित करण्यात आले होते. परंतु, ठाणेकरांवर करवाढीचा बोजा हवाच कशाला असे मत भाजपा आणि राष्ट्रवादीचे झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी करवाढीचे दोनही ठराव रद्द करण्यासंदर्भातील नवा ठराव मांडला. त्याला भाजपाच्या नगरसेवकांनीही अनुमोदन दिले. तसेच महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही या ठरावाला अनुकुलता दर्शविली होती.आता मात्र, प्रत्यक्षात महासभेने केलेला ठराव नामंजूर किंवा रद्द करायचा झाला तर तो २० फेबु्रुवारी आधी करणे अपेक्षित होते. परंतु, मार्च महिन्यात तो आल्याने त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक नव्हते. अखेर महासभेच्या याच ठरावाला केराची टोपली दाखवून प्रशासनाने ठाणेकरांकडून आता १५ टक्के करवाढीनुसार वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ती कमी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र दिले होते. तरीही आता मालमत्ताकराच्या जललाभ कर, मल:निसारण कर, मल:निसारण लाभ कर आणि रस्ता करामध्ये १९ टक्क्यांची कपात केल्याचे भासवून ती १५ करवाढीसह वसूल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.अशी होणार करवाढया नुसार आता मालमत्ताकरातंर्गत जल लाभ कर,मल:निसारण लाभ कर, मल:निसारण कर, रस्ता कर यामध्ये करण्यात आलेल्या ३४ टक्के मालमत्ता कराच्या दरवाढीपैकी निवासी मालमत्तांसाठी १९ टक्के तर बिगरनिवासी मालमत्तांसाठी ३१ टक्क्यांवरून १६ टक्के दरवाढ कमी केली आहे. तर रस्ता करातील दरवाढ पूर्णपणे रद्द केली आहे. त्यानुसार आता २०१८-१९ या आर्थिक वर्षात जललाभकर निवासी १७ टक्के, अनिवासी २२ टक्के, मल:निसारण लाभकर निवासी १४ टक्के, बिगरनिवासी १७.५ टक्के, मल:निसारणकर निवासी १० टक्के तर बिगरनिवासी १३ टक्के असा राहणार आहे.

टॅग्स :TaxकरThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका