शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बंदच्या काळात ठाणे परिवहन सेवेचे १५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:29 IST

भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातही बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या काळात परिवहनच्या ६ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून परिवहनचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपरिवहनच्या जुन्या बसेसचा विमाच नाहीनव्या बसेसचा विमा प्रस्ताव अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत

ठाणे -भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्सफूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु काही ठिकाणी या बंदला हिसंक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसात ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसेसचे नुकसान झाले आहे. त्यातही परिवहन प्रशासनाने अद्यापही बसेसचा विमा न काढल्याने हा खर्च प्रशासनालाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली.                  भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच बंद कºयांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको केले. परंतु यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बसेस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरु होती. परंतु काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बसेस सोडण्यास बंद केले. परंतु या काळात परिवहनच्या ६ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून, यामध्ये दोन बसेसचे खुप नुकसान झाल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली. मंगळवारी सांयकाळी देखील परिवहनच्या पाच बसेसला टारगेट करण्यात आले होते. दोन दिवसात परिवहनच्या ११ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये परिवहनच्या जुन्याच बसेसचा समावेश आहे.दरम्यान, या बसेसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु परिवहनने अद्यापही बसेसचा विमाच काढलेला नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत अशा वेळी परिवहनच्या बसेस टारगेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतांना देखील परिवहनच्या बसेसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसेसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजुर जरी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.बुधवारी झालेल्या बंदच्या काळात परिवहनच्या बसेस सकाळी ११ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या होत्या. सांयकाळी सहा नंतर बसेसची सेवा हळू हळू पूर्वपदावर आणण्यात आली. परंतु तो पर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त