शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

१४९० इमारती धोकादायक मुंब्य्रातील संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 00:45 IST

यादी जाहीर; मनपाच्या निर्णयाकडे लक्ष

ठाणे : एकीकडे शहरातील कोरोनाचे संकट भीषण होत असतांना दुसरीकडे येत्या काही दिवसांत येणाऱ्या पावसाळ्यात धोकादायक इमारतींची समस्यादेखील आ वासून उभी आहे. एकट्या मुंब्रा विभागात १४९० इमारती या धोकादायक तर १४ इमारती या अतिधोकादायक असल्याचेही महापालिकेच्या यादीवरून दिसत आहे. त्यामुळे महापालिका त्या खाली करणार की, अन्य काही पर्याय निवडणार, याकडे लक्ष लागले आहे.

शहरात दोन महिन्यांपासून लॉकडाउन असतांनाही कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांची मागणीही वाढली आहे. दुसरीकडे येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्याच्या या कालावधीत नालेसफाई, गटारांची सफाई करण्याबरोबरच मागील काही वर्षांत धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

१०८९ इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीची गरज

च्धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने आता नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सी १- अतिधोकादायक, सी २ अ इमारत तोडून पुन्हा उभी करण्यास शक्य, आणि सी ३ ब- तत्काळ दुरुस्त करता येणे शक्य, तर सी ३ किरकोळ दुरुस्तीला परवानगी देता येणे शक्य, अशा इमारतींचा समावेश असून महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी वेबसाइटवर टाकली आहे.च्ज्यामध्ये सी-१ मध्ये १४ इमारतींचा समावेश आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी इमारत खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर सी २ अ मध्ये ५९, सी २ ब मध्ये ३२५ इमारतींचा समावेश आहे.

१४ इमारती अतिधोकादायक :

आजघडीला मुंब्य्रात १४९० इमारती या धोकादायक स्थितीत असून १४ इमारती या अतिधोकादायक स्थितीत आहेत. २०१२ मध्ये शीळफाटा येथे झालेल्या लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेत ७४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेनंतर महापालिकेने धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :mumbraमुंब्रा