शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१४ लाख पानांचे झाले डिजिटायझेशन; दुर्मीळ ग्रंथांसह पुस्तकांचे होणार जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:25 IST

मराठी ग्रंथसंग्रहालयाने सुरू केलेल्या डिजिटायझेशन योजनेत आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन झाले आहे. लवकरच पुढील सहा लाख पानांचे डिजिटायझेशन करून या नावीन्यपूर्ण योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालयाने सुरू केलेल्या डिजिटायझेशन योजनेत आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन झाले आहे. लवकरच पुढील सहा लाख पानांचे डिजिटायझेशन करून या नावीन्यपूर्ण योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे.मराठी ग्रंथसंग्रहालयाने १२५ वर्षे पूर्ण केली आहे. या ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांमध्ये दीड लाख पुस्तके असून बाइंडिंग केलेली साडेतीन हजार मासिके, ९० हस्तलिखिते, तर ग्रंथालयाच्या स्थापनेपासून पुढील ५० वर्षांतील ४० हजार पुस्तके आहेत. या दुर्मीळ ग्रंथांचे, जीर्ण पुस्तकांचे जतन व्हावे, या जीर्ण झालेल्या पुस्तकांची पृष्ठे हाताळणे अशक्य असल्याने वाचकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि ही पुस्तके जगभरात वाचली जावी, यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने डिजिटायझेशन ही नावीन्यपूर्ण योजना अमलात आणली. या पुस्तकांचे डिजिटायझेशन करून ती संगणकावर उपलब्ध झाली, तर त्याचा वाचक, अभ्यासकांना फायदा होईल, त्यांना सहजपणे त्यांचा वापर करता येईल. वाळवी लागणे, पाने फाटणे यासारख्या समस्याही दूर होतील, यासाठी ही योजना आणल्याचे संग्रहालयाचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी सांगितले.छापील स्वरूपात असलेले साहित्य हे डिजिटल स्वरूपात येईल. संगणकावर ते उपलब्ध होईल. सीडी, डीव्हीडी, हार्डडिस्कवर साहित्य उपलब्ध होईल. प्रत्येक पृष्ठाची प्रत स्वच्छ वाचता येईल. पुस्तकांची पुनर्बांधणी करण्यात येईल, हे या योजनेचे निकष आहेत.या योजनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ५० हजारांचा निधी दिला आहे. आॅक्टोबरपासून डिजिटायझेशन करण्यास सुरुवात झाली आहे. हे काम पुण्यातील एका एजन्सीला दिले आहे. यासाठी निविदाही काढल्या होत्या, असे काळे यांनी सांगितले.पहिला टप्पा २० लाख पानांचाटप्प्याटप्प्यांत पानांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात २० लाख पानांचे डिजिटायझेशन करावयाचे आहे. आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन केले आहे. उर्वरित सहा लाख पानांचेही डिजिटायझेशन केले जाणार आहे. संस्थेची वाचकसंख्या जवळपास सहा हजार आहे. यामध्ये नियमित संग्रहालयात येणारे वाचक, संस्थेच्या अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी, याशिवाय दूरवरून येणारे एम.फील., पीएच.डी. व इतर संशोधकांसह देशाबाहेरील संशोधकांचाही समावेश आहे. हे सगळे या योजनेचे लाभार्थी आहेत, असे संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे