शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटींचा निधी परत; नाट्यगृह, प्रशासकीय इमारत रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:47 IST

बदलापूर नगरपालिका प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी २०१५ मध्ये सरकारने १४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला होता.

बदलापूर : बदलापूर नगरपालिका प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी २०१५ मध्ये सरकारने १४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र तीन वर्षात हा निधी संबंधित प्रकल्पासाठी वापरला न गेल्याने तो पुन्हा सरकारकडे जमा झाला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा फटका बसला आहे.नाट्यगृहासाठी जागाच मिळत नसल्याने प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. मात्र प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जागाच नसल्याने हा निधी वापरलाच गेला नाही. अशीच काहीशी परिस्थिती प्रशासकीय इमारतीबाबत होती. इमारतीच्या जागेचा वाद असल्याने त्या जागेवर इमारत उभारता आलेली नाही. इमारत उभी न राहिल्याने तो निधीही परत जाण्याच्या मार्गावर होता. मात्र इमारतीच्या जागेचा वाद सुटल्यावर पालिकेने इमारत उभारण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र हाच पाठपुरावा सुरु असताना अधिकाºयांच्या लक्षात आले की निधी सरकारकडे परत गेला आहे. मात्र त्याची कोणतीही माहिती प्रशासन आणि अधिकाºयांना नव्हती.नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत स्थानकाजवळच्या जागेत प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. १४.१४ कोटीपैकी ७ कोटी इमारतीसाठी वापरता येईल. तसेच नगरपालिकेकडेही ५ कोटी शिल्लक आहेत त्याचा वापर करता येईल असे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सभेत स्पष्ट केले. प्रत्यक्षात निधी वापराविना पडून राहिल्याने तो परत गेला. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होता. मात्र त्याचा वापर दोन वर्ष न झाल्याने तो परत गेला. हा निधी परत मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.