शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराच्या वसुलीतून १३९ कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:14 IST

कल्याण-डोंबिवली मनपा : २०१९ च्या तुलनेत २३ कोटींनी उत्पन्न कमी

कल्याण : केडीएमसीच्या मालमत्ताकर वसुलीस कोरोनामुळे फटका बसला आहे. एप्रिल ते आतापर्यंत मनपाने १३९ कोटी रुपये वसूल केले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वसुली २३ कोटींनी कमी आहे. मनपाला मालमत्ताकराच्या वसुलीचे ४३२ कोटींचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र, सध्याच्या काळात ते गाठण्याचे एक मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.केडीएमसीच्या उत्पन्नाची मदार ही मालमत्ताकर, पाणीपट्टी व विकासशुल्कावर अवलंबून आहे. मालमत्ताकर वसुली विभागाने सप्टेंबर २०१९ अखेर १६२ कोटींची वसुली केली होती. मात्र, यंदा मार्चपासून कोरोनाचा फटका बसल्याने त्या तुलनेत २३ कोटींनी वसुली कमी झाली आहे. वसुलीचा हा आकडा वाढवण्यात येणार आहे.मात्र, यंदाच्या सप्टेंबरची वसुली पाहता सप्टेंबर २०१९ च्या वसुलीपेक्षा चार कोटींनी वसुली पुढे आहे, असा दावा करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी केला आहे.पुढील सहा महिन्यांत २९९ कोटींची वसुली करायची आहे. तरच, ४३२ कोटींचे वसुलीचे लक्ष्य गाठता येणे शक्य आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर, अनेकांना पगारकपातीचा फटका बसला आहे.त्यामुळे मालमत्ताकराच्या वसुलीसाठी तगादा लावू नये, करात सूट द्यावी, अशा मागण्या नगरसेवकांकडून होत आहेत. परिणामी, वसुलीचे लक्ष्य गाठणे प्रशासनाला कठीण होणार आहे.१८ गावे वगळल्याने २०० कोटींवर पाणी?केडीएमसी हद्दीतून १८ गावे वगळल्याने मनपाला मालमत्ताकरात मोठा फटका बसला आहे. या गावांतून या कराच्या थकबाकीपोटी किमान २०० कोटी रुपये येणे अपेक्षित होते. मात्र, आता ही थकबाकी वसुली बारगळली आहे.दुसरीकडे मनपाने कर न लावलेल्या जवळपास ८० हजार मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून, त्या मालमत्तांकडून करापोटी उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे करवसुलीत भर पडू शकते, असा दावा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केला होता.प्रत्यक्ष वसूल होणाºया रकमेतून विकासकामे मंजूर होणार आहेत. सध्याच्या उत्पन्नातील बहुतांश रक्कम ही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर खर्च केली जातआहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका