शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी मलनिस्सारणास १३८ कोटींची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:44 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत भूमिगत मलनिस्सारण प्रकल्पाच्या १३८ कोटींच्या निधीला नगरविकास खात्याने मंगळवारी मंजुरी दिल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

डोंबिवली : केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत भूमिगत मलनिस्सारण प्रकल्पाच्या १३८ कोटींच्या निधीला नगरविकास खात्याने मंगळवारी मंजुरी दिल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या महापालिकेच्या काही भागांमध्ये भूमिगत मलनिस्सारण प्रकल्पाचे काम आधी झाले आहे, पण निधीअभावी ते रखडले होते. ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता निधी मिळाल्याने उवर्रित काम मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यामुळे पालिकेतील रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल. आयुक्त पी. वेलरासू काम करत नाहीत, असे म्हणण्यापेक्षा सध्या निधी नाही; पालिकेचे बजेट कोलमडलेले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही विविध टेंडर प्रक्रि या कशाला राबवायची, असा सवाल राज्यमंत्र्यांनी केला. क्षमतेपेक्षा अधिक अर्थसंकल्प फुगवायचा आणि नंतर राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी करायची हे योग्य नसल्याचा टोला त्यांनी लगावला. पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून सगळ््यांनी निधी मिळवण्यासाठी एकत्र यावे. आर्थिक स्थिती कशी मजबूत होईल याबाबत विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. आता जो निधी नगरविकासखात्याने मंजूर केला आहे, त्यासाठी ज्या आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता अधिकाºयांनी तातडीने करावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, असे सुचवून ते म्हणाले, काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच सहकाय करू.ही योजना तातडीने अंमलात यावी. यातील अर्धा निधी महापालिकेने उभा करायचा असतो. कर्ज मिळवण्यासाठी राज्य सरकरा सहकार्य करतेच. येथील अधिकाºयांना ते नवीन नाही, असे लक्षात आणून देताना चव्हाण यांनी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल राज्यमंत्री म्हणून नव्हे तर डोंबिवलीचा आमदार म्हणून समाधानी असल्याचे सांगितले. येत्या चार महिन्यात महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारेल, असे नाही; पण कामे सुरू आहेत हे वेगाने दिसायला लागेल. त्यादृष्टिने योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी आयुक्त वेलरासू यांनाही थोडा वेळ द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका