शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात आढळले १३४१ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 03:09 IST

ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १८२ नवे रुग्ण सापडल्याने शहरात २४ हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे एक हजार ३४१ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख १२ हजार ६०० वर पोहोचली आहे. तर, ३६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा तीन हजार २१४ झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १८२ नवे रुग्ण सापडल्याने शहरात २४ हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ७७८ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपात ४२४ रुग्ण नव्याने आढळून आले. तर, आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील मृतांची संख्या ५३८, तर बाधितांचा आकडा २५ हजार ९८४ झाला आहे.नवी मुंबईत ३३२ रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या २२ हजार ६०७, तर मृत्यूची संख्या ५३१ वर गेली आहे. उल्हासनगरला ३५ रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत सात हजार ५३६ बाधित रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे २०५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात १५ रुग्ण नव्याने सापडले असून तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह आतापर्यंत चार हजार २५ बाधितांसह २८१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेमध्ये १२० रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यंूची नोंद झाली. या शहरात आता बाधितांची संख्या ११ हजार ३९५, तर मृतांची संख्या ३८३ झाली आहे.अंबरनाथ शहरात ५४ रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता चार हजार ६३९ बाधित, तर १७८ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ४८ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ७१८ झाले आहेत. मृतांची संख्या ६५ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राही १३१ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत. या गावपाड्यांत आतापर्यंत आठ हजार ५०१ बाधितांची तर २५६ मृतांची नोंद झाली आहे.