शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर

By नितीन पंडित | Updated: November 6, 2023 20:20 IST

महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सोमवारी घोषित केले.

भिवंडी : महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सोमवारी घोषित केले. कामगार प्रतिनिधी व आयुक्त यांच्यामध्ये आयुक्त दालनात झालेल्या बैठकी नंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीस भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटील, कामगार कर्मचारी कृती संघटनेचे घनश्याम गायकवाड, महेंद्र कुंभारे, राजेश जाधव, गौतम शेलार, प्रकाश पाटील, प्रदीप शिर्के, राजेंद्र काबाडी, दीपक राव आदी कामगार कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत आयुक्तांनी १३ हजार ५०० रुपयांच्या अनुदानाला मान्यता दिली. यातील बारा हजार रुपये ही दिवाळी सणापूर्वी व उर्वरित पंधराशे रुपये ही पुढील महिन्यात रोख रक्कम ज्या प्रमाणे  उपलब्ध असेल त्यानुसार देण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली.          दरम्यान महापालिकेच्या बजेटमध्ये मनपा कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानसाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली असून, याप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांना १४ हजार २०० व दरवर्षाप्रमाणे १ हजार रुपये वाढीव असे १५ हजार २०० रुपये अनुदान देणे बंधनकारक असतानाही पालिका प्रशासनाने काही कामगार संघटनांना व आमदारांना हाताशी धरून कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मनपा प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात दोन दिवसात मनपा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा लेबर फ्रंट युनियनचे अध्यक्ष एडवोकेट किरण चन्ने यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी