शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील काटई गावात इमारतीच्या पार्किंग मधील १३ दुचाकी जाळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:20 IST

भिवंडी : तालुक्यात काटई गावच्या हद्दीतील तळवलीनाका येथे इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या १३ दुचाकींना शनिवारी पहाटेच्या वेळी आग लागली.काटई ग्रामपंचायत हद्दीत तळवली नाका येथील ओमसाई अपार्टमेंटमध्ये राहणा-या सुजय हिरालाल तिवारी यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून शनिवारी पहाटे धूर येऊन त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावले तेंव्हा त्यांना इमारतीखाली काही ...

ठळक मुद्देओमसाई अपार्टमेंटमध्ये तिवारींच्या खिडकीतून पहाटे घुसला आगीचा धूरपार्किंगच्या जागेत गाळे बनविण्याचा जागामालक व विकासकांचा प्रयत्नरहिवाश्यांनी गाळ्यांना विरोध केल्याने दुचाकीचे नुकसान

भिवंडी : तालुक्यात काटई गावच्या हद्दीतील तळवलीनाका येथे इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या १३ दुचाकींना शनिवारी पहाटेच्या वेळी आग लागली.काटई ग्रामपंचायत हद्दीत तळवली नाका येथील ओमसाई अपार्टमेंटमध्ये राहणा-या सुजय हिरालाल तिवारी यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून शनिवारी पहाटे धूर येऊन त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावले तेंव्हा त्यांना इमारतीखाली काही जळत असल्याचे जाणवले. त्यांनी इमारतीतील शेजाऱ्यांना व इतर कुटुंबियांना उठवून खाली नेले. तेथे त्यांनी पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या सर्व दुचाकी आगीत जळत असल्याचे पाहिले. सर्वांनी मिळून तात्काळ अग्निशामक दला व पोलीसांना या घटनेची माहिती दिली. मनपाच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन ही आग विझवली.या आगीत सहा दुचाकी पूर्णपणे जाळून खाक झाल्या असून सात दुचाकींना आगीची धग लागून जळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे .या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात सुजय हिरालाल तिवारी यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रआर दिली आहे.ओम साई अपार्टमेंट या इमारतीचे जमीन मालक खान शमीम मेहमूद व विकासक विजय गोराडकर यांनी या इमारतीच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत व्यावसायीक गाळे बनविण्याचा प्रयत्न केला होता.त्यास इमारतीमधील रहिवाश्यांनी विरोध करीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला .त्यानंतर गेले वर्षभर वारंवार पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या दुचाकी वाहनांचे सीट फाडणे , टायर कापणे , हॅण्डल लॉक मध्ये फेविक्विक टाकणे असे प्रकार होऊ लागले. परंतु त्याकडे रहिवाश्यांनी दुर्लक्ष केले. मात्र शनिवारी दुचाकीनांच आग लावल्याची घटना घडल्यानंतर येथील रहिवाश्यांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग