शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

ऑल आऊट कोबींग ऑपरेशन मोहीमेत १२९ गुन्ह्यांची उकल, ११६ आरोपी अटकेत

By अजित मांडके | Updated: February 25, 2023 15:46 IST

ठाणे : ठाणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालात राबविलेल्या आॅल आऊट कोबींग मोहीमेत अवैध्य शस्त्रजप्ती, फरार, अग्नीशस्त्रे बाळगणे, हॉटेल, डान्सबार तपासणे ...

ठाणे :

ठाणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालात राबविलेल्या आॅल आऊट कोबींग मोहीमेत अवैध्य शस्त्रजप्ती, फरार, अग्नीशस्त्रे बाळगणे, हॉटेल, डान्सबार तपासणे आदींसह इतर प्रकारची मोहीम राबवित १२९ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल ११६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मोहीमेत १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये २४ ते २५ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आलेल्या या मोहीमेत पोलीस सह आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदशनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शाखेतील सर्व घटकांचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत गुन्हेगारी कृत्याला बसावा या उद्देशाने आॅल आऊट कोबींग आॅपरेशन राबविण्यात आले होते. त्यानुसार अवैध्य शस्त्र बाळगणे, महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२, अवैध्य धंद्यावर केलेली कारवाई, पॅरोल उल्लंघन आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, लॉजेस, डान्सबार, हाटेल, पब यांची तपासणी करणे, सराईत गुन्हेगारीवरांवर प्रतिंबधक कारवाई करणे आदी मोहीम यावेळी राबविण्यात आली. त्यासाठी २२३ पोलीस अधिकारी व १०५४ पोलीस अंमलदार इतके मनुष्यबळ वापरण्यात आले होते.

त्यानुसार १२९ गुन्हा नोंदविण्यात आले असून ११६ आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. तसेच १ लाख १३ हजार ७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

तपशील - गुन्हे - अटक आरोपीअवैध्य शस्त्र बाळगणे - ०३ - ०३महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२ - ०८ - ०८अवैध्य धंद्यावर केलेली कारवाई - ६६ - ३९दारुबंदी गुन्हे - ५६ - ४७जुगार प्रतिबंधक गुन्हे - ०९ - १९अंमली पदार्थ - २९ - २९स्टॅडींग वॉरेन्ट - १४ - १४पाहिजे - - - ०४-------------------------------------------------एकूण -१२९ - ११६

वाहतुक शाखेकडून करण्यात आलेली कारवाई - आॅल आऊट आॅपरेशन अंतर्गत ठाणे शहर वाहतुक शाखेकडून २२३६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार १५५३ वाहनांचे चालकाविरुध्द नियमांचे उल्लघन केल्याने त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजार ४०३ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.आॅटो रिक्षा कारवाई - ४४३ १ लाख ४७ हजार ५०३डंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह - ६० - न्यायालयात हजरविना परवाना - २६ - ७७,०००गणवेश परिधान न करणे - ८५ - ६०,५००विना हेल्मेट - ४७७ - २,३९,५००सिग्नल जंम्पींग - ५१ - ५१,५००सीट बेल्ट न लावणे - ६४ - १४,७००मोबाइल टॉकींग - १३ - २४,०००इतर कारवाई - ३३४ - २,४४,७००---------------------------------------------------एकूण - १५५३ - ८,५९,४०३