शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

१२७० झाडांची कत्तल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 03:04 IST

वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी : वनमहोत्सवानंतर महिन्याभरात संक्रांत

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा असतानाही शनिवारच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत तब्बल १२७० झाडे तोडण्याच्या ठरावांना नगरसेवकांनी मंजुरी दिली. एकीकडे वन आणि हरित महोत्सव साजरा करायचा आणि दुसरीकडे झाडे तोडायला मंजुरी द्यायची असा दुटप्पीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.मीरा- भार्इंदरच्या वृक्षप्राधिकरण समितीमध्ये कुणीच तज्ज्ञ सदस्य नसतानाही समिती कार्यरत असून मनमानीपणे झाडे तोडण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेतही शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा पांडे यांनी वृक्षप्राधिकरण समितीमध्ये तज्ज्ञ सदस्य नसल्याने समिती बेकायदा असून ती रद्द करणे तसेच या बेकायदा समितीच्या नैनीताल दौऱ्याचा खर्च संबंधित अधिकाºयांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव आणला होता. परंतु सत्ताधारी भाजपाने तो बहुमताने फेटाळला. तर आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही वेळ मारून नेणारे उत्तर दिले.शनिवारी आयक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत १२७० झाडे तोडण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. भार्इंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा स्मशानभूमीपर्यंतच्या रस्तारूंदी करणासाठी तब्बल ११८६ झाडे तोडण्याची परवानगी दिलीआहे.रस्त्याच्या डाव्या बाजूस एकूण ५१५ झाडे असून त्यातील ४०२ झाडे मूळासहित काढणार तर ११३ झाडांचे पुर्नरोपण केले जाणार आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूची ६७१ झाडांपैकी ३९८ झाडे मूळासकट काढणार असून त्यातील २७३ झाडांचे पुर्नरोपण केले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने यापूर्वीही पर्यावरणाचा ºहास केल्याचे उघड झाले आहे.वृक्षप्राधिकरण नव्हे ही तर वृक्षतोड समितीविविध विकासकामांच्या आड ठरणारी ३० झाडे तोडण्यास तर धोकादायक या नावाखाली ५४ झाडे तोडण्यास समितीने मंजुरी दिली. बेकायदा चालणाºया समितीने केवळ झाडे तोडण्यास मंजुरी देण्याचा सपाटा लावलेला असून वृक्ष प्राधिकरण समिती की वृक्षतोड समिती, असा प्रश्न सजग नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड