शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२५९ रुग्णांची नव्याने भर; ३६ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 20:42 IST

ठाणे मनापा परिसरात ३४९ नवे रुग्ण आढळून आले असून आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात एक हजार २५९ रुग्ण गुरुवारी आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९७ हजार रुग्ण बाधीत झाले आहेत. तर, आज ३६ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ९८३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे मनापा परिसरात ३४९ नवे रुग्ण आढळून आले असून आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आजपर्यंत ४२ हजार ६२६ बाधीत रुग्ण झाले असून एक हजार ८६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. कल्याण-कल्याण डोंबिवलीत नव्याने २५१ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्ण संख्या ४७ हजार १४९ झाली आहे. आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तार्पयत या शहरात ९३० जणांचा मृत्यू झालेला आहे.      उल्हासनगर शहरात २१ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता कोरोना रुग्णाची संख्या नऊ हजार ७६४ झाली आहे. तर मृतांची संख्या ३२१ नोंदवण्यात आली आहे. भिवंडी शहरात ४२ बाधीत आढळून आले असून आज एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आतापर्यंत पाच हजार ५७४ बाधीत असून मृतांची संख्या ३२६ आहे. मीरा भाईंदरमध्ये १६२ रुग्णांची तर आज सहा मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात २० हजार ९६७ बाधितांसह ६५७ मृत्यू झाले आहे.

अंबरनाथमध्ये १६ रूग्ण सापडले असून आज दोघा मृतांची नोंद आहे. आता बाधितांची संख्या सहा हजार ८९३ असून मृत्यू २५३ आहेत. बदलापूरमध्ये ३० रुग्णांचा नव्याने शोध लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ८३६ झाले आहेत. या शहरात आज सहा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ९३ झाली आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ४० रुग्ण आज सापडले असून चार मृत्यू झाले आहेत. या क्षेत्रात १५ हजार ८०८ बाधीत झाले असून मृतांची संख्या ४८२ वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे