शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळवा पुलासाठी ११०० टनांचा सांगाडा बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:18 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत चर्चा केल्यानंतर महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : दोन ते अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कळवा खाडीपुलावरील तिसऱ्या पुलाचे महत्त्वाचे काम गुरुवारी केले जाणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ११०० मेट्रिक टन वजनाचा सांगाडा (स्पॅन) जमिनीपासून १४ मीटर उंचीपर्यंत उचलण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता हा सांगाडा बसविला जाणार आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. जुलै किंवा ऑगस्टपासून या पुलावरून वाहतूक सुरू होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत चर्चा केल्यानंतर महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे.  कळवा पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे, दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या तिजोरीतून कंत्राटदाराला तब्बल १३२ कोटी रुपये दिले गेले होते. डिसेंबर २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम रेंगाळले होते. या पुलाचे काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकार व महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता.दरम्यान, कळवा पुलाचा १०० मीटर लांब व १७.५ मीटर रुंदीचा ११०० मेट्रिक टन वजनाचा सांगाडा गुरुवारी १४ मीटरपर्यंत उचलून पुलाच्या पिलरवर ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यानंतर, या सांगाड्यात काँक्रिट टाकून पूल तयार केला जाणार आहे. 

दुसऱ्या टप्प्याचे काम सात दिवसांनंतरया पुलासाठी १८१ कोटी १९ लाखांचा खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत कंत्राटदाराला १३२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या  टप्प्यात हा स्पॅन १०८ मीटर जमिनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारण्यात आलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा सात दिवसांनंतर सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

७७ टक्के काम पूर्ण झाल्याचा महानगरपालिकेचा दावाकळवा खाडीवरील पुलाची लांबी ३०० मीटर असून त्यापैकी १०० मीटर मुख्य लांबीचा हॅण्डल आकाराचा स्पॅन बांधण्यात येणार आहे. या पुलावर क्रिक रस्ता व कोर्ट नाक्यावरील वाहने चढण्याकरिता सरळ मार्ग राहणार आहे. तसेच साकेतकडून येणाऱ्या वाहनांकरिता वर्तुळाकार रॅम्प बांधण्यात येणार आहे. 

ठाणे-बेलापूर जाण्यासाठी थेट मार्ग करण्यात येणार आहे. विद्युतीकरण, खाडी पुलाकडील दोन्ही जंक्शन व साकेत राबोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंक्शनमध्ये सुधारणा आदी बाबींचा यात समावेश आहे.  त्यानुसार, २.४० किमीचे बांधकाम होणार आहे. आतापर्यंत ७७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

टॅग्स :thaneठाणे