शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ११०० आश्रमशाळा उपाशी

By admin | Updated: August 30, 2015 21:32 IST

राज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी

जान्हवी मोर्ये, ठाणेराज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी दिला जाणारा निधी राज्य सरकारकडून अडीच महिने उलटून गेले तरी अद्याप मिळालेला नाही. ही धक्कादायक बाब शिक्षक भारती या संघटनेने उघडकीस आणली आहे. लोकभारती या पक्षाचे आमदार कपील पाटील व शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे, विजय शिंदे, विजय घोडविंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांना भेटी दिल्या. त्यात हे विदारक सत्य उघडकीस आले. आश्रमशाळांना खर्चापोटी ३० टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ दिला जातो. यापैकी एक रुपयाही निधी सरकारने अडीच महिने उलटून गेले तरी वितरीत केलेला नाही. यासंदर्भातील तक्रार मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी केली आहे. मुरबाड तालुक्यातील तळवली पाड्यावर व्हर्च्युअल क्लास आणि डिजिटल अशा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले शाळा ते चालवितात. सातशे विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकतात. त्यांच्यासाठी जेवण, गॅस कुठून आणायचा. त्यासाठी उधारी आणि उसनवारी केली जाते. गणवेश न मिळाल्याने जुनाच गणवेश घालून शाळेत मुले बसतात. त्यांची शैक्षणिक आबाळ होत आहे. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीसाठी साकारणाऱ्या बजेटमधून आश्रमशाळांचा खर्च केला जातो. शासनाने निधी न देणे म्हणजे घटनात्मक तरतुदीला हरताळ फासून जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. याविषयी त्यांनी भाजप खासदार कपील पाटील व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे.