शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीचे दहावीत १०० टक्के यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:54 IST

सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे.

डोंबिवली : सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. ‘ओमकार’मधील श्रेयस करोली व रोहित नलावडे या विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये तर, होली एंजल्स शाळेतील धनशिता देसाई हिने सामाजिकशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.‘ओमकार’मधील ४० विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यात सात विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. ८० ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक १२ विद्यार्थ्यांनी, तर ७० ते ८० टक्क्यांपेक्षा ११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. श्रेयस आणि रोहित यांनी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. श्रेयस हा ९५.०४ टक्के गुण मिळवून शाळेतही प्रथम आला आहे. आदिती सिंग ही ९५. ०२ टक्के गुणांसह द्वितीय तर हृदया शिवराजन ही ९३.०८ टक्के गुणांसह तृतीय आली आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका दर्शना सामंत यांनी दिली.होली एंजल्स शाळेतून १४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. अभिनव अय्यर याने ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. शाळेतील २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. धनशिता हिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत, अशी माहिती शाळेचे संचालक ओमीन डेव्हीड यांनी दिली.मुलींनी मारली बाजीकल्याणच्या आर्य गुरूकुल शाळेत वेदिका चव्हाण ही ९७.६० टक्के गुणांसह प्रथम आली आहे. तनिषा टेमघरे (९७.४०) द्वितीय, तर श्रेया पारख (९६.४०) तृतीय आली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका राधामणी अय्यर यांनी दिली.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र