शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चक्क १०९ गुंठे जमीन लाटली, आठ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:30 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन सुमारे १०९ गुंठे जमीन स्वत:च्या नावाने करणाऱ्या आठ जणांविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महसूल कर्मचा-यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देसाई गावातील रामदास पाटील यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

ठाणे - बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन सुमारे १०९ गुंठे जमीन स्वत:च्या नावाने करणाऱ्या आठ जणांविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महसूल कर्मचा-यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देसाई गावातील रामदास पाटील यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. ठाणे महानगरपालिकेने दिवा देसाई गावात रस्ता रु ंदीकरण मोहिमेदरम्यान जमीन मालकांना रस्त्यासाठी आपली जागा टीडीआर च्या बदल्यात देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत देसाई गावातील नागरिकांनी पालिकेकडे त्यांच्या जागेच्या मोबदल्यात टीडीआर साठी यांनी अर्ज केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. महसूल विभागातील अधिकाºयांच्या संगनमताने नावात फेरफार करुन १२ गुंठे जागेचे टोकन दिल्यानंतर १०९ गुंठे जागा आपल्या नावावर केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी १७ मार्च रोजी पाटील यांनी डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून महसूल विभागाकडूनही याबाबतचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रामदास पाटील (६१) रा. देसाई पाटीलवाडा, ठाणे यांची वडीलोपार्जित १०९ गुंठे जमीन देसाई येथे आहे. ती त्यांच्या कुटूंबातील २५ जणांच्या नावाने आहे. यातील १२ गुंठे जमीन २७ लाख रु पयात विकण्याचा व्यवहार रामदास यांचे भाऊ कृष्णा यांच्याकडून सुरु होता. मात्र, तो पूर्ण पैसे न दिल्याने रद्द झाला. परंतु व्यवहारादरम्यान घेण्यात आलेली दस्त यावर बनावट स्वाक्षºया करून बनावट दस्त बनवून १०९ गुंठे जमीन देसाई तलाठी कार्यालयातील तलाठी मदतनीस जितेंद्र देशमुख आणि एकनाथ गोटेकर यांनी बनविले. त्यांनी बनावट दस्ताच्या आधारावर १०९ गुंठे जमीन दुसºयांच्या नावाने करून फेरफार १४६१ आणि १४६२ हे नोंदविले. या व्यवहाराची मूळ जमीन मालकांना मात्र काहीच माहिती नव्हती. वडीलोपार्जित जमीन ठाणे महापालिकेच्या रस्त्यात बाधित होत असल्याचे समजल्यानंतर पाटील कुटुंबीयांच्या जमीनीबाबत ठामपाकडे बाधित जागेचा टीडीआर मिळण्याची मागणी जितेंद्र देशमुख आणि सुनंदा वाघमारे यांनी केली. पाटील कुटूंबियांची १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावाने झाल्याचे जानेवारी २०१८ मध्ये उघड झाले. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये जितेंद्र देशमुख (रा. डोंबवली, सुनंदा वाघमारे (रा. मीठबंदर रोड ठाणे), एकनाथ गोटेकर, यशवंत शिंदे रा., चरई, ठाणे, ए. एम. मिरकुटे रा. देसाई, अजय पाटील तत्कालीन मंडळ अधिकारी दहिसर ,फुलचंद पाटील रा. खिडकाळी, ठाणे आणि विश्वनाथ म्हात्रे रा. देसाई आदी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.जिल्हाधिकाºयांसह पोलीस आयुक्तांकडे धावयातील चौकशीला महिना उलटूनही कोणालाही अटक न झाल्याने पाटील कुटूंबियांनी अखेर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणात महसूल विभागाची चौकशी सुरू असून यामध्ये अनेक तलाठी आणि तत्सम अधिकाºयांचे संगनमत असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दोन वेळा सुनावणीही झाली. त्यानंतर या जमिनी शासन आदेश काढून मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रि या सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटील कुटूंबियांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे.मृतांच्या नावे स्वाक्षरीविशेष म्हणजे ताराबाई म्हात्रे यांचे २००६ मध्ये तर धोंडीबाई मुंढे यांचे २०१० मध्येच निधन झाले आहे. तरीही त्यांच्या नावे बनावट स्वाक्षºया आणि रजिस्ट्रेशन केल्याचेही आरोपींनी दाखविल्याचीही बाब उघड झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेcrimeगुन्हे