शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १०० तज्ज्ञांकडून क्लस्टरचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:43 IST

ठाणेकरांना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाºयांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य देण्याकरिता नेमलेल्या सल्लागारांनी ठाणे महापालिका अभियंत्यांच्या १० टीम तयार केल्या असून त्यांच्या माध्यमातून शहरातील शाळा, मैदाने, रस्ते, झोपडपट्टी आदींसह इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.

ठाणे : ठाणेकरांना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाºयांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य देण्याकरिता नेमलेल्या सल्लागारांनी ठाणे महापालिका अभियंत्यांच्या १० टीम तयार केल्या असून त्यांच्या माध्यमातून शहरातील शाळा, मैदाने, रस्ते, झोपडपट्टी आदींसह इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.ठाणे स्टेशन आणि वागळे पट्टा या भागाचा पहिल्या टप्प्यात सामूहिक विकास केला जाणार आहे. याकरिता, सल्लागारांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी किमान आठ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. क्लस्टर योजनेत ४ एफएसआयला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, पालिकेने याआधीच क्लस्टरचा अभ्यास सुरू केला आहे. या वाढीव एफएसआयमुळे झोपडपट्टी विकासाला अधिक फायदा होणार आहे.या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका अर्बन रिन्युव्हल प्लान तयार करणार असून योजना कोणत्या भागात कशा पद्धतीने राबवता येऊ शकते, याचा अभ्यास करणार आहे. परंतु, हा अभ्यास करत असतानाच उर्वरित ठिकाणी क्लस्टरची योजना राबवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ठाणे महापालिकेचे ८० अभियंते आणि सल्लागारांचे ३० जण असे मिळून तब्बल शंभरहून अधिक तज्ज्ञांची फळी सध्या प्रत्येक प्रभाग समितीत फिरत असून त्या ठिकाणी रस्ते कसे आहेत, मैदाने किती आहेत, गार्डन, शौचालये आदींसह इतर नागरी आरक्षणांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या सुविधांच्या अभ्यासानंतरच क्लस्टरच्या परिणामांचा तपशील हाती येईल.हरकती, सूचनांनंतरच प्रक्रिया मार्गी लागणारदुसºया टप्प्यात प्रत्येक भागाच्या सीमा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानंतर, विकास आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.प्रत्येक विभागाचा आराखडा तयार केला जाणार असून यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतरच खºया अर्थाने क्लस्टरचा विकास होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे