शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत ठाण्यात १०० डेसिबलचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:13 IST

ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देताना डीजेचा दणदणाट

ठाणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यास बंदी घातली आहे. असे असले तरी ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देताना डीजेचा दणदणाट झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ध्वनी मर्यादेने १०० डेसिबल गाठल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी ढोलताशा, फटाक्यांची आतशबाजी आणि डीजेचा दणदणाट झाला होता. त्यामुळे तो आता १० दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीतही तो वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू नये, असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील पुढील निकाल १९ सप्टेंबर रोजी लागणार आहे. असे असतानाही ठाण्यात डीजेचा दणदणाट होणार हे मनसे आणि राष्टÑवादीने स्पष्ट केले होते. बेडेकर यांनी शहरातील १० ठिकाणच्या ध्वनीची पातळी तपासली असता, राम मारुती रोड येथे रात्री ८.२०च्या सुमारास ९० ते ९५ डेसिबल, गोखले रोड ९५ ते १०० डेसिबल, मल्हार सिनेमा ९०, बाफना सर्जिकल सर्व्हिस रोड ८५ ते ९०, वर्तकनगर ९० ते ९५, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी ८५ ते ९०, शास्त्रीनगर ९५ ते १००, टीएमसी निपुण हॉस्पिटल ८५ ते ९०, पाचपाखाडी ९५ आणि देवधर हॉस्पिटल गोखले रोड येथे आवाजाची पातळी ही १०० डेसिबलपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.नियम धाब्यावरपाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेसोबत ढोलताशा, अ‍ॅम्प्लीफायर्स आदींचा दणदणाट दिसून आल्याचे महेश बेडेकर यांनी सांगितले. काही राजकीय पक्षांनी यासंदर्भात आधीच सूतोवाच केले होते. मिरवणुकीत ते खरे ठरले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवthaneठाणे