शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मोकळ्या जागांवरील कर थकबाकी १०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:15 IST

मीरा-भाईंदर पालिका : बिल्डरांकडून वसूल करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

मीरा राेड : सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात मालमत्ता करात ५० टक्के सवलत न देणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेने मोकळ्या जागांवरील करापोटी असलेली तब्बल १०० कोटींपेक्षा जास्तीची थकबाकी मात्र बिल्डरांकडून वसूल करण्यास टोलवाटोलवी चालवली आहे .मीरा-भाईंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मोकळ्या जागांवर कर आकारणी सुरू केली. या जागांवरील कर आकारणीची २०२०-२०२१ची एकूण मागणी विचारात घेतली तर थकबाकीची रक्कम तब्बल १०० कोटी १६ लाख ५५ हजारांवर गेली आहे. यापैकी मागील थकीत मागणी ७१ कोटी ७० लाख ७ हजार २९० तर चालू वर्षातील मागणी २८ कोटी ४६ लाख ४८ हजार २९८ इतकी आहे. १०० कोटींच्या थकबाकीपैकी न्यायालयीन व इतर कारणांसाठी आलेली स्थगितीची एकूण रक्कम आठ कोटी ९० लाख ९९ हजार ३७५ इतकी आहे. त्यातील ७ कोटी ५२ लाख ३६ हजार ९६९ ही मागील तर चालू वर्षातील स्थगितीची रक्कम १ कोटी ३८ लाख ६२ हजार ४०६ इतकी आहे.मालमत्ता कर आकारणी किंवा भोगवटा दाखला दिनांकापर्यंत केलेल्या मोकळ्या जागेची कर आकारणी, परंतु भरणा न केलेली रक्कम ७ कोटी १३ लाख ३० हजार ६५३ इतकी आहे. त्यात मागील थकबाकी ६ कोटी ३७ लाख ३६ हजार ८५८ तर चालू वर्षातील थकबाकी ७५ लाख ९३ हजार ७९५ इतकी आहे. व्याजाची रक्कमही २४ कोटी ७६ लाख ३९ हजार इतकी झाली आहे. त्यातही मागील थकीत १५ कोटी ७२ लाख ८ हजार २७१ तर चालू वर्षातील व्याजाची रक्कम ९ कोटी ४ लाख ३० हजार ७४९ इतकी आहे.५ कोटी ९८ लाखांची केली वसुलीन्यायालयीन व वादातील प्रकरणे तसेच मालमत्ता कर व भोगवटा दाखला दिलेल्या थकीत रकमेला वगळून एकूण थकबाकीची रक्कम ५३ कोटी ३७ लाख ८४ हजार ६५० रुपये इतकी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मोकळ्या जागेवरील निव्वळ मागणी ही ५९ कोटी ३५ लाख ८६ हजार ५४० रुपये असून, त्यात मागील थकबाकी ४२ कोटी ८ लाख २५ हजार १९२ तर चालू वर्षाची रक्कम १७ कोटी २७ लाख ६१ हजार ३४८ रुपये इतकी आहे. पालिकेने चालू आर्थिक वर्षात एकूण ५ कोटी ९८ लाख १ हजार ८९० रुपये इतकी मोकळ्या जागांची कर वसुली केलेली आहे. त्यातील २ कोटी ४१ लाख ३८ हजार ३११ ही मागील थकबाकीपैकी तर ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ५७९ चालू कराची आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक