शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलमध्ये एकाच दिवशी 100 बालकांवर शस्त्रक्रिया; हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 06:31 IST

सध्या रुग्णालयात दर दिवशी ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.

ठाणे : महागड्या रुग्णालयात लाखाे रुपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हिल रुग्णालयात येतात.

यानुसार रविवारीही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटांतील १०० मुला-मुलींच्या डोळ्यांची, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ आदीं शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्याचा विक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी डाॅक्टरांनी केला. सध्या रुग्णालयात दर दिवशी ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.

ठाणे, पालघर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश

ठाणे शहरात अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळख असलेले सिव्हील रुग्णालय दीड वर्षांपासून येथील वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत केले आहे. मात्र, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० ते ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. मात्र, रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

सायन रुग्णालयाचे सहकार्य बालकांच्या या नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन दिवस

अगोदरच मुलांना घेऊन पालक रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय रुग्णालयाने केली. केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता  डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली  मुला, मुलींच्या  हर्निया, चरबीची गाठ, डोळ्यांचा तिरळेपणा, फाटलेले ओठ,  हायड्रोसील, फायमोसिस, चिकटलेली बोट, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी सायन रुग्णालयाचे मोठे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत के.ई.एम. हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता  डॉ. संजय ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी  सिव्हील रुग्णालयात लहान मुलामुलींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुर्बिणीद्वारे बहुतांश शस्त्रक्रिया केल्या. सिव्हील रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे आहेत.

- डॉ. कैलास पवार,

जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

ठाणे सिव्हील रुग्णालयात चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे केवळ ऐकून होतो. मात्र, आज प्रत्यक्ष अनुभवले आहे. सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया पार पडत असतील तर सर्वांनी सिव्हीलमध्ये येऊन उपचार घ्यावेत.

- प्रमिला जाधव,

रुग्णाचे नातेवाईक, कल्याण