शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

१० रस्त्यांचा ताबा नाही तरीही पालिकेने काढली निविदा!

By अजित मांडके | Updated: February 17, 2024 16:15 IST

२८४ रस्त्यांची कामे पालिकेने घेतली हाती, ३४ रस्त्यांचे भवितव्याचे काय?

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्त्यांची हमी दिली आहे. त्यानुसार शहरातील २८४ रस्त्यांची कामे दोन टप्यात हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी ६०५ कोटींचा खर्च पालिकेच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, या २८४ रस्त्यांपैकी ३४ रस्ते असे आहेत जे महापालिकेच्या अखत्यारीत नाहीत, तरीही या रस्त्यांच्या बांधकामाच्या संदर्भात निविदा काढण्यात आल्या आणि कंत्राटदार नेमण्यात आले. त्यातही यातील १० रस्त्यांवर कामच करता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली आहे. असे असतानाही त्या रस्त्यांवर पैसा का खर्च केला जातोय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.  दुसरीकडे उर्वरीत २४ रस्ते ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु असून ते केव्हा ताब्यात येणार याचेही उत्तर पालिकेकडे नाही.

मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रस्तांची डागडुजी नवीन रस्ते तयार करणे, सुशोभिकरणासह इतरही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातही आता कुठे रस्त्यांची कामे प्रत्यक्षात दृष्टीपथात येत असून महापालिकेने हाती घेतलेल्या हे रस्ते डांबरी, सिमेंट कॉंक्रीट, मास्टीक अशा पध्दतीने केली जात आहेत. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबरअखेर सुरू करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आले. विशेषत: महापालिका प्रशासनाला पहिल्या टप्प्यातील १२७ रस्त्यांसाठी २१४ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील १५७ रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून ३९१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातही या दोनही टप्यातील कामांसाठी वांरवार तारखा बदलण्यात आल्या. आता पुन्हा आणखी १५ दिवसांची मुदत पालिकेने घेतली आहे. आॅक्टोबर पासून हा तारीख पे तारीखचा खेळ सुरु आहे. पाच मुदतवाढ देऊनही सरासरी ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे ९० टक्के आणि दुसऱ्या टप्यातील कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत.  

त्यातही आता एकूण २८४ रस्त्यांपैकी आतापर्यंत २५० रस्त्यांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर पोहोचली आहेत. उर्वरित ३४ रस्त्यांपैकी २४ रस्त्यांच्या बांधकामात जागेअभावी अडचणी येत आहेत. ज्यामध्ये कळवा-०४, मुंब्रा-०२, दिवा-०४, घोडबंदर-०३, वर्तक नगर-०२, वागळे-०२ आणि इतर ठिकाणे या तीन रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचा ताबा घेण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उर्वरित १० रस्ते असे आहेत की ते अद्यापही महापालिका प्रशासनाला आपल्या ताब्यात घेता आलेले नाहीत. तर ते ताब्यातही घेता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. तर या रस्त्यांसाठी जागाच उपलब्ध नसल्याचेही पालिका सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मग अशा रस्त्यांसाठी निविदा का काढली, ठेकेदारांना कामे का दिली असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका