शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘टायगर’साठी २४ तासांत १० लाख, मृत्यूशी झुंज सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 03:06 IST

गटारापाशी सापडलेल्या टायगर नावाच्या नवजात बालकाच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी त्याची मृत्यूशी झुंज संपत नसल्याने, उल्हासनगरात चितेंचे वातावरण आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : गटारापाशी सापडलेल्या टायगर नावाच्या नवजात बालकाच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी त्याची मृत्यूशी झुंज संपत नसल्याने, उल्हासनगरात चितेंचे वातावरण आहे. त्याच्यावरील उपचारासाठी मदतीचे आवाहन करताच वाडिया रुग्णालयाच्या खात्यात एका दिवसात १० लाखांचा निधी जमा झाल्याची माहिती ‘टायगर बचाओ’ मोहिमेचे शिवाजी रगडे यांनी दिली.वडोलगावच्या नालीत ३० डिसेंबर रोजी नवजात बालक सापडले. या बाळावर मध्यवर्ती रुग्णालयाने उपचार सुरू केले. गटाराच्या पाण्याने त्याच्या रक्तात संसर्ग झाल्याचे उघड झाले. तो बरा होत नाही, तोच डोक्याला संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रगडे यांनी पदरमोड करून त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला पोलिसांना दिला. त्याकरिता, न्यायालयातून परवानगी मिळवली. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मेंदूत पाणी झाल्याचे उघड झाल्याने टायगरला मुंबईतील वाडिया रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या डोक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मात्र, बुधवारी रात्री त्याला पुन्हा उलट्या झाल्याने, पुढील उपचारासाठी पैशांची गरज निर्माण झाली. रगडे यांनी रुग्णालयाकडे मदतीची विनंती केली. त्यांनी नियमानुसार खाजगी संस्था ‘केटा’ला मदतीचे आवाहन करण्यास सांगितले. ‘केटा’ने आवाहन करताच, एका दिवसात १० लाखांचा निधी जमा झाला. यातून पुढील उपचार होणार असून टायगर लवकर बरा होईल, अशी आशा रगडे दाम्पत्याने व्यक्त केली.उल्हासनगरचा आयकॉनसव्वा महिन्याच्या टायगरचे नाव शहरातील प्रत्येकाच्या तोंडी असून तो उल्हासनगरमध्ये संघर्षाचा, जिद्दीचा आयकॉन झाला आहे. टायगर हा प्रत्येकाच्या घरातील सदस्य झाला आहे. टायगर लवकरच ठणठणीत बरा होऊन शहरात परत यावा, अशी प्रार्थना जागोजागी करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर