शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१० नगरसेवकांवर टांगती तलवार? पक्षांतर करून निवडणूक लढले, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:49 IST

महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी तत्कालीन पक्षातील पदाचा राजीनामा न देता पक्षांतर करून निवडणूक लढवली. अशा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पालिका आयुक्तांकडे करून स्मरणपत्र दिले

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी तत्कालीन पक्षातील पदाचा राजीनामा न देता पक्षांतर करून निवडणूक लढवली. अशा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पालिका आयुक्तांकडे करून स्मरणपत्र दिले आहे. यामुळे पक्षांतर करणाºया नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पक्षांतर करण्यापूर्वी आधीच्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे देणे आवश्यक होते. त्यांनी तसे न केल्याने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम, १९८६ मधील कलम ३ (१)(अ) नुसार नगरसेवकपदास पात्र ठरत नाही, अशी माहिती गंगोत्री व नगरसेविका सुनीता बागूल यांनी दिली.महापालिका निवडणुकीत पक्षांतर करून लढवलेली निवडणूक नियमानुसार अपात्र ठरते. पालिका सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरतात. अशांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे केली आहे. महासभेत या विषयावर चर्चा झाल्यावर निंबाळकर यांनी गंगोत्री यांच्याकडे कायदेशीर माहितीसाठी वेळ मागितला. मात्र अजूनही याबाबत आयुक्तांनी निर्णय न घेतल्याने, त्यांनी पुन्हा आयुक्तांना स्मरणपत्र दिले आहे.हे आहेत ते उल्हासनगरचे नगरसेवकमहापालिका निवडणुकीत साईपक्षाच्या नगरसेविका जयश्री पाटील भाजपाच्या तिकिटावर तर रिपाइच्या नगरसेविका आशा बिºहाडे भाजपा तर पुष्पा बागूल शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या.काँगे्रसचे नगरसेवक राजेश वधारिया, मीना सोंडे, कांचन लुंड, दीप्ती दुधानी हे साई पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीच्या लक्ष्मी सिंग, शुभांगी बहेनवाल, रेखा ठाकूर या भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.पक्षांतर करून आलेल्या या १० नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी गंगोत्री यांनी केली आहे. दरम्यान, आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातंर्गत उल्हासनगरचे पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे ते सध्या रजेवर गेले आहेत.पालिका आयुक्त नेमके कधी हजर होणार हे निश्चित सांगता येत नसल्याने या संदर्भात कुठला निर्णय घेतात याकडे या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर