शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांवर २५० कोटींचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 00:01 IST

सातवा वेतन आयोग : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे मोडणार कंबरडे

नारायण जाधव ठाणे : राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी राज्यातील २६ महापालिकांसह ३६२ नगरपालिकांंच्या कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. अगोदरच जकात बंद झाल्याने आणि जीएसटीपोटी मिळणाºया तुटपुंज्या अनुदानामुळे जेरीस आलेल्या ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अक्षरश: कंबरडे मोडणार आहे. कारण, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक वेतनाच्या खर्चात कमीतकमी २२ टक्के वाढ होणार आहे. याचा मोठा फटका जिल्ह्यातील सहा महापालिकांसह दोन नगरपालिकांना बसणार असून, वर्षाकाठी २५० कोटींहून अधिक बोजा त्यांच्यावर पडणार आहे.

सर्वात मोठा फटका ठाणे महापालिकेला बसणार असून वार्षिक १२५ कोटींहून अधिक रकमेचा बोजा ठामपाला सहन करावा लागणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेवर वार्षिक २५ कोटींचा बोजा पडणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने १० कोटींची तरतूद केली असली, तरी सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीही या महापालिकेने अद्याप दिलेली नाही. तोच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा भार तिच्यावर लादण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेवर वार्षिक १८ कोटी, तर भिवंडी महापालिकेवर अंदाजे २० ते २४ कोटींचा बोजा पडणार आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेला वार्षिक २२ कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेवर सात कोटी तर बदलापूर नगरपालिकेवर साडेपाच कोटींचा भार पडणार आहे.

... तर हाती येणार भिकेचा कटोरामहापालिका आणि नगरपालिकांमध्ये दैनंदिन साफसफाईसह पाणीपुरवठा खात्यात हजारो कंत्राटी कामगार आहेत. शिवाय, परिवहनसेवेमध्येही हजारो कामगार आहेत. त्यांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास तो भार आणखी वाढणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती भिकेचा कटोरा घेण्याची पाळी येणार आहे.

विकासकामांवरही येणार गदाराज्य शासनाने अमृत योजना, स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामांसह सुवर्णजयंती नगरोत्थानअंतर्गत बहुतेक महानगरांत अनेक कामे सुरू केली आहेत. मेट्रो, मोनोची कामे करण्यात येत आहेत. यात ३३ ते ५० टककयांपर्यंत हिस्सा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे. यासाठी सर्वच संस्थांनी शेकडो कोटींचे कर्ज घेतले आहे. त्याचा हप्ता भरण्यासाठीही दरवर्षी मोठा बोजा सहन करावा लागत आहे. शिवाय, भारतीय रेल्वेच्या मुंबई महानगर प्रदेशात लोकल वेळेवर धावण्यासाठीच्या सीबीसीटीसी योजनेसाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या पालिकांवर १० ते १५ टक्के भार टाकलाय.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका