शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

By अजित मांडके | Updated: April 22, 2024 15:49 IST

मोठी कारवाई, १७० जणांना अटक

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या भरारी पथकाने लोकसभा निवडणुकीची १६ मार्चला आचारसंहिता लागल्यापासून १९ एप्रिल पर्यंत कारवाई केली. यात सुमारे १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात ९० लाखाचा अवैध मद्य साठ्यांचा समावेश आहे. तर १७० जणांना अटक करण्यात आली असून  एकूण २७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फ्लाईंग स्कॉडच्या दोन पथकानी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यात ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध दारुवर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्कॉर्डने कंबर कसली होती. यात १६ मार्च ते १९ एप्रिल  या कालावधीत या पथकाने रसायन, हातभट्टीचे देशी मद्य, विदेशीमद्य, बिअर, वाईन, शॅमपेयन, बनावट मद्य, ताडी, काळा गुळ आदी  कारवाई करून जप्त केली आहे यांत एकूण २७६ गुन्हे दाखल आहेत. त्यात १६८ वारस गुन्हे तर १०८ बेवारस गुन्हे दाखल आहेत.

एकूण  १७० जणांना अटक झाली असून ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत १ कोटी ४२ लाख ६३ हजार २८० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात  आला. ठाणे जिल्ह्यात खाडीकिनारी खारपुट्टीच्या जंगलात अगदी आत मध्ये गावठी दारूच्या  हातभट्ट्या लावल्या जातात.तिथे जाण्यासाठी अशा दारू माफियांच्या स्वताच्या बोटी आहेत. या बोटीतून आता हे माफिया गावठी दारूची ने आण करतात. अनेक वेळा स्थानिक पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून अशा भट्ट्यावर कारवाई करण्यात आली आहे.लोकसभा  निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अवैध मदयसाठा, बनावट मदय, त्याची वाहतूक आणि विक्री. हे प्रकार रोखण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन विशेष भरारी पथकाची निर्मिती केली आहे. या  पथकात एक निरीक्षक,दोन उपनिरीक्षक,चार कॉन्स्टेबल, एक वाहक अशा आठ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणे