वॉशिंग्टन : वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा दिग्गज खेळाडू अॅँडी मरे याने काईल एडमंडला पराभूत करत विजयी पुनरागमन केले. दुखापतीनंतर ११ महिन्यांनंतर मैदानात उतरलेल्या मरेने चौथ्या मानांकित एडमंडला ७-१,१-६,६-४ असे पराभूत करत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.जागतिक क्रमवारीत ८३ व्या स्थानी असलेल्या मरेला पुढील फेरीत रोमानियाच्या मारियस कोपील याच्याशी लढावे लागणार आहे. कोपीलने फ्रान्सच्या १४ व्या मानांकित जेरेमी चार्डी याला ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.गतविजेता जर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेव याने ट्यूनिशियाच्या मालेक जाजीरा याला ६-२,६-१ असे पराभूत केले. त्याचा पुढील सामना त्याचा मोठा भाऊ मिश्चा ज्वेरेव याच्याशी होणार आहे. एटीपी स्पर्धेत प्रथमच दोन भाऊ एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.
वॉशिंग्टन ओपन टेनिस : अॅँडी मरेची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 04:48 IST