शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपन : सानिया मिर्झा आणि शुआई पेंगचं आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 08:31 IST

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारतीय स्टार सानिया मिर्झा व पेंग या जोडीचा पराभव झाला आहे.

न्यूयॉर्क, दि. 9 - यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारतीय स्टार सानिया मिर्झा व पेंग या जोडीचा पराभव झाला आहे. या सामन्यात मार्टिना हिंगिस- युंग जान चान या जोडीनं त्यांच्यावर 6-4,6-4 असा विजय मिळवला आहे.  या विजयसाह मार्टिना हिंगिस- युंग जान चाननं महिला दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.  

दरम्यान, सानियानं चीनच्या शुआई पेंगसोबत खेळताना उपांत्यपूर्व सामन्यात टिमिया बाबोस- आंद्रिया लावास्कोवा यांचा ७-६,६-४ असा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत बाहेर पडलेल्या सानियाची यंदा ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. सानियाने मागच्यावर्षी आठ जेतेपद पटकविले त्यापैकी पाच जेतेपद मार्टिना हिंगिससोबत होते. वर्षाअखेर दुहेरी रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर होती पण हिंगिसपासून विभक्त होताच वारंवार जोडीदार बदलल्याने सानिया नवव्या स्थानावर घसरली.

व्हिनसचे स्वप्न भंगलेदरम्यान, अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू व्हिनस विलियम्स हिला यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्याच स्लोएने स्टीफन्स हिने चुरशीच्या सामन्यात व्हिनसला पराभवाचा धक्का दिला. डाव्या पायाला दुखापत झाल्याने तब्बल ११ महिने कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टीफन्सने सातवेळेची चॅम्पियन व्हीनस विलियम्सला ६-१, ०-६, ७-५ असे पराभूत केले. अमेरिकेचीच १५ वी मानांकित मेडिसन कीस ही मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर दहा महिन्यांनी कोर्टवर परतली. तिने आपलीच सहकारी २० वी मानांकित कोको वांडेवेगे हिच्यावर ६-१, ६-२ असा विजय नोंदवित अंतिम फेरीत धडक दिली. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत दोन्ही स्थानिक खेळाडू खेळण्याची १५ वर्षांत ही पहिली वेळ आहे. याआधी २००२ मध्ये सेरेना विलियम्सने व्हीनसला नमविले होते. स्टीफन्स आणि कीस या जीवलग मैत्रिणी आहेत. फेडरेशन चषकाच्या संघात त्या सोबतच खेळतात. स्टीफन्स म्हणाली, ‘आमच्यात जीवाभावाचे नाते आहे. दीर्घकाळ सोबत असताना मैत्रिणीविरुद्ध खेळणे सोपे जाणार नाही.’ दोघींमध्ये आतापर्यंत एकमेव लढत मियामी येथे २०१५ ला झाली. त्यात स्टीफन्सने बाजी मारली होती.