शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

यूएस ओपन; डॉमनिक थिएमला नमवून राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 03:14 IST

गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम राखताना यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

न्यूयॉर्क : गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम राखताना यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत रोमांचक झालेल्या आणि पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात नदालने नवव्या मानांकीत डॉमनिक थिएमचे कडवे आव्हान परतावले. दुसरीकडे महिलांमध्ये बलाढ्य सेरेना विलियम्सनेही विजयी आगेकूच करताना उपांत्य फेरी गाठली.बुधवारी रात्री उशीरा झालेल्या सामन्यात नदालने ०-६, ६-४, ७-५, ६-७ (४-७), ७-६ (७-५) असा झुंजार विजय मिळवला. थिएमने धडाकेबाज सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये नदालला एकही गेम जिंकू दिला नाही. परंतु, यानंतर नदालने जबरदस्त झुंज देताना थिएमला अखेरपर्यंत घाम गाळायला लावला. पहिला सेट सहजपणे गमावलेल्या नदालने तिसऱ्या व चौथ्या सेटमध्येही आपली सर्विस गमावली. चार तास ४९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या मॅरेथॉन लढतीत नदालने आपला सर्व पणास लावत थिएमला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. थिएमने १८ ऐस आणि ७४ विनर मारले, मात्र त्याचवेळी त्याला ५८ चुकांचा फटकाही बसला. उपांत्य सामन्यात नदालपुढे तिसºया मानांकीत युआन मार्टिन डेल पोत्रोचे कडवे आव्हान असेल.डेल पोत्रोनेनेही सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर झुंजार विजय मिळवत जॉन इस्नरचे आव्हान ६-७(५-७), ६-३, ७-६(७-४), ६-२ असे परतावले. याआधी २००९ साली यूएस ओपनचे जेतेपद पटकावलेल्या डेल पोत्रोने कारकिर्दीत तिसºयांदा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी, या पराभवाने २००३ नंतर यूएस ओपन उपांत्य फेरी गाठणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरण्याचे इस्नरचे स्वप्नही धुळीस मिळाले. (वृत्तसंस्था)सहा वेळा यूएस ओपन जेतेपद उंचावलेल्या अमेरिकेच्या बलाढ्य सेरेना विलियम्सने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करताना आठव्या मानांकीत कॅरोलिन प्लिस्कोवाचे आव्हान सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले. या शानदार विजयासह सेरेनाने उपांत्य फेरीत धडक मारली.२४ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेरेनाने सुरुवातीलाच आपली सर्विस गमावली. मात्र यानंतर तिने सलग ८ गेम जिंकताना पहिल्या सेटवर कब्जा करत आघाडी घेतली. यानंतर दुसºया सेटमध्ये ४-० अशी आघाडी घेतल्यानंतर सेरेनाने सहज विजय मिळवला.हा सामना खूप रोमांचक झाला आणि यामध्ये विजय मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण हे योग्य आहे. विजय मिळवल्यानंतर मी डॉमनिकची माफी मागितली. तो शानदार खेळाडू असून माझा खूप जवळचा मित्र आहे. त्याला मोठे जेतेपद पटकावण्यासाठी आणखी संधी मिळतील.- राफेल नदाल

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालUS Open 2018अमेरिकन ओपन टेनिस