शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

यूएस ओपन : फेडररची झुंजार सलामी, १९ वर्षीय टायफोने दिली कडवी टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:32 IST

यंदाच्या विम्बल्डनमध्ये एकही सेट न गमावता विक्रमी आठव्यांदा जेतेपद पटकावलेल्या लिजंड रॉजर फेडररला यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत ५ सेटपर्यंत झुंजावे लागले.

न्यूयॉर्क : यंदाच्या विम्बल्डनमध्ये एकही सेट न गमावता विक्रमी आठव्यांदा जेतेपद पटकावलेल्या लिजंड रॉजर फेडररला यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. अमेरिकेचा १९ वर्षीय बिगरमानांकीत फ्रान्सिस टायफो याने बलाढ्य फेडररला झुंजवले. त्याचवेळी, स्पेनच्या राफेल नदालने सहज विजयी सलामी देत तीन सेटमध्ये बाजी मारली.स्वित्झर्लंडच्या फेडररने २ तास ३८ मिनीटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात विजय खेचून आणला. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर फेडररने सलग दोन सेट जिंकत पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये बाजी मारत टायफोने सामना अंतिम पाचव्या सेटमध्ये नेला.यावेळी, फेडररने आपला सर्व अनुभव पणास लावताना ४-६, ६-२, ६-१, १-६, ६-४ असा विजय मिळवला. यंदा आॅस्टेÑलियनव विम्बल्डन विजेतेपद पटकावलेला फेडरर आपल्या २०व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.दुसरीकडे, नदालने सहज विजयी सलामी देताना सर्बियाच्या डूसैन लैजोविक याला ७-६(६), ६-२, ६-२ असे नमविले. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर नदालने आक्रमक खेळ करताना युवा लैजोविकला फारशी संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)महिलांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने विजयी सलामी देत झेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोवा हिला६-०, ६-७(५-७), ६-३ असे नमवले. पुरुषांमध्ये सहाव्या मानांकीत आॅस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याने आॅस्टेÑलियाच्या अ‍ॅलेक्स डी मायनॉर याचा ६-४, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. तसेच, अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयर याने अनपेक्षित विजय नोंदवताना फ्रान्सच्या २६व्या मानांकीत रिचर्ड गास्केत याला ३-६, ६-२, ६-४, ६-२ असा धक्का दिला.