शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

US Open 2018: राफेल नदाल उपांत्य फेरीत, थिएमने विजयासाठी पाच तास झुंजवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 11:43 IST

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी आणखी एका चुरशीच्या सामन्याची मेजवानी मिळाली.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी आणखी एका चुरशीच्या सामन्याची मेजवानी मिळाली. राफेल नदाल आणि डॉमनीक थिएम यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना रोमहर्षक झाला. अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या या सामन्यात नदालने बाजी मारली. नदालने हा सामना 0-6, 6-4, 7-5, 6-7(4/7), 7-6(7/5) असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अव्वल मानांकित स्पेनच्या नदालला पहिल्याच सेटमध्ये ऑस्ट्रीयाच्या थीएमने धक्का दिला. थिएमने 6-0 अशा फरकाने हा सेट घेत आघाडी घेतली. मात्र, नदालने पुढील दोन सेट 6-4, 7-5 असे जिंकून दमदार कमबॅक केले. चौथ्या सेटमध्ये थिएमने टायब्रेकरमध्ये रंगरलेल्या चुरशीत बाजी मारून आव्हान कायम राखले होते. थिएमने 7-6 ( 7/4) अशा फरकाने हा सेट घेत 2-2 अशी बरोबरी मिळवली. 

पाचवा सेटही टायब्रेकरवर गेल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली. दोन्ही खेळाडूंनी तोडीसतोड खेळ केला. थिएमने नदालची सर्व्हीस ब्रेक करताना दमदार खेळ केला. तत्पूर्वी, महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि लॅटव्हियाची अनास्तासिया सेव्हास्तोव्हा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सेरेनाने 1 तास 26 मिनिटांत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव केला, तर सेव्हास्तोव्हाने अमेरिकेच्या स्लोआन स्टिफन्सचा 6-2, 6-3 असा पराभव केला. 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालUS Open 2018अमेरिकन ओपन टेनिसTennisटेनिस