शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

US Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 11:59 IST

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला... जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावून इतिहास घडवला.

न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला... जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावून इतिहास घडवला. जेतेपदाच्या लढतीत आपल्यासमोर लहानपणापासून जिला आदर्श मानले ती सेरेना विल्यम्स आहे, याचे कोणतेही दडपण न ठेवता ओसाकाने सरळ सेटमध्ये बाजी मारली. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद जिंकणारी ती पहिली जपानी खेळाडू ठरली, तर लि ना हिच्यानंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी आशियाई महिला टेनिसपटू ठरली. या जेतेपदानंतर ओसाकाच्या मनात नेमक्या कोणत्या भावना दाटल्या असतील याचा अंदाज बांधणे किंवा त्या शब्दबद्ध करणे कठीणचं, परंतु तिच्या या जेतेपदानं जपानच्या दुःखावर आनंदाची फुंकर मारली आहे.

जपानच्या होक्काईडो येथे आलेल्या भुकंपात 30 हून अधिक लोकं मृत्युमुखी पडली आहेत आणि हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. निसर्गाच्या कोपाचा सामना करणाऱ्या जपानवासीयांसाठी ओसाकाचे जेतेपद सुखद गारवा घेऊन येणारे ठरले आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी ओसाकाचे अभिनंदन केले आहे. ''अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्याबद्दल ओसाकाचे आभार. सध्या संकटांशी दोन दोन हात करणाऱ्या जपानच्या प्रत्येक नागरिकाला तुझे जेतेपद ताकद आणि प्रेरणा देणारे ठरेल,''असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. जपानच्या ज्या होक्काईडो भागात भुकंप आला तेथे ओसाकाचे 73 वर्षांचे आजोबा तेत्सुओ ओसाका राहतात आणि ओसाकाचा सामना टिव्हीवर पाहताना ते रडत होते. तेत्सुओ यांच्याप्रमाणे जपानमधील प्रत्येक जण ओसाकाने जेतेपदाचा चषक उंचावला त्यावेळी भावूक झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी ओसाका फ्लोरिडा येथे स्थायिक झाली. आई तमाकी ओसाका जपानची आणि वडील लिओनार्ड फ्रान्सोईस हे हैतीचे... पण, जपानमध्ये जन्म झाल्यामुळे तिला आईचे आडनाव लावावे लागले. तिसऱ्या वर्षी ती कुटुंबासोबत फ्लोरिडा येथे स्थायिक झाली. तिथेच तिने टेनिसचे धडे गिरवले, परंतु ती जपानचे प्रतिनिधित्व करते... म्हणून तिला अमेरिकेतील 'जपानी गुडिया' असे लाडानं म्हणतात...

 

 

टॅग्स :US Open 2018अमेरिकन ओपन टेनिसTennisटेनिस