शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

US open: १९ वर्षीय कोको गॉफ ठरली अमेरिकन ओपनची नवी चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 09:32 IST

US open: पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको गॉफने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

न्यूयॉर्क : पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको गॉफने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने  तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या एरिना सबालेंकाला पराभवाचा धक्का दिला.

या शानदार विजयासह कोको ही दिग्गज सेरेना विलियम्सनंतरची ही स्पर्धा जिंकणारी पहिली किशोरवयीन महिला खेळाडू ठरली.  सेरेनाने १९९९ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. कोकोने खराब सुरुवातीनंतर कमालीचे पुनरागमन केले. तिने अखेरच्या  दोन सेटमध्ये सबालेंकाकडून  झालेल्या चुकांचा फायदा घेत २-६,  ६-३, ६-२ असा जबरदस्त विजय मिळवला. या पराभवानंतरही  सबालेंका जागतिक क्रमवारीत प्रगती करेल. 

डब्ल्यूटीए क्रमवारीत सबालेंका पोलंडच्या इगा स्वीयातेकला मागे टाकत अव्वलस्थानी कब्जा करेल. तसेच, कोको कारकिर्दीत सर्वोत्तम तिसऱ्या स्थानी पोहोचेल. महिला एकेरीतील या अंतिम सामन्यासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली. 

मी अत्यंत खूश असून, आता पूर्णपणे निश्चिंतही झाली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी यावेळी इतरांसाठी नाही; पण स्वत:साठी जिंकू इच्छित होती. हे जेतेपद माझ्यासाठी विशेष आहे. हीच कामगिरी कायम राखण्याचा माझा प्रयत्न असेल.- कोको गॉफ

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान निश्चित झाल्याने यूएस ओपन जेतेपद हुकल्याचे दु:ख कमी झाले आहे. मी नक्कीच अग्रस्थानाचा आनंद साजरा करेन. कोर्टवर माझ्याकडून अनेक चुका झाल्या. मी सामन्यादरम्यान अतिविचार करत खेळली. - एरिना सबालेंका

टॅग्स :Tennisटेनिस