शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय टेनिसमध्ये ठोस व्यवस्था नाही- सुमित नागल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 07:35 IST

आपले अनेक खेळाडू या खेळामध्ये सातत्याने खेळत आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे.

न्यूयॉर्क : ‘टेनिसमधील इतिहास पाहता भारताने या खेळामध्ये याहून अधिक चांगली कामगिरी करायला पाहीजे होती. मात्र भारतीय टेनिसमध्ये ठोस व्यवस्थेचा अभाव आहे,’ अशी प्रतिक्रिया देत यूएस ओपनमध्ये पहिला सामना जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या सुमित नागलने भारतीय टेनिस व्यवस्थेवर टीका केली.२३ वर्षीय नागल म्हणाला की, ‘या शानदार विजयाने मी नक्कीच आनंदी आहे, मात्र दुसरी बाजू बघितल्यास आपण याहून अधिक चांगली कामगिरी करु शकलो असतो. आपले अनेक खेळाडू या खेळामध्ये सातत्याने खेळत आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे. परंतु, कोणती व्यवस्था नाही आणि याचे मला दु:ख होते.’आपल्या कामगिरीविषयी नागल म्हणाला की, ‘या स्पर्धेतील पहिल्या फेरीत मिळवलेला विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी येथे खेळण्याचा आनंद घेतोय. या सामन्यातील संभाव्य विजेता असल्याची जाणीव असतानाही कोर्टवर जाणे सोपे नव्हते. मी काहीसा नर्व्हस होतो आणि ग्रँडस्लॅममधील माझ्या पहिल्या विजयासाठी खेळत होतो. मी संयम कायम राखला आणि माझा नैसर्गिक खेळ केला.’ (वृत्तसंस्था)>सुमित नागलचा क्लानवर विजयसुमित नागल युएस ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लानला पराभूत करत गेल्या सात वर्षांमध्ये ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत एकेरीत सामन्यात विजय मिळवणारा पहिला भारतीय बनला आहे. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना तिसºया स्थानावर असलेल्या डॉमिनिक थिएमसोबत होईल. मंगळवारी रात्री उशिरा दोन तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१,६-३, ३-६,६-१ असे पराभूत केले. क्लान हा विश्व रँकिंगमध्ये फक्त एका स्थानाने पुढे आहे. या आधी देखील २०१३ मध्ये सोमदेव देववर्मन हा कोणत्याही ग्रॅण्डस्लॅममध्ये एकेरीत विजय मिळवणारा अखेरचा भारतीय होता. याआधी २०१३ मध्ये भारताच्या सोमदेव देववर्मन याने यूएस ओपनमध्येच स्लोवाकियाच्या लुकास लैको याला नमवून विजयी सलामी दिली होती. २०१७ साली सोमदेवने निवृत्ती घेतली. मात्र त्याने २०१३ साली ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसºया फेरीत धडक मारली होती.