शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

रणनीती हेच माझ्या खेळाचे बलस्थान, कोर्टवरील परिस्थितीवरून खेळ : सिमोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:31 IST

मारिन सिलीच व केविन अ‍ॅँडरसन या दिग्गज खेळाडूंना पराभूत करीत जाईल्स सिमोन याने आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकाविले आहे.

पुणे : मारिन सिलीच व केविन अ‍ॅँडरसन या दिग्गज खेळाडूंना पराभूत करीत जाईल्स सिमोन याने आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकाविले आहे.तो म्हणाला, ‘मी रणनीती तयार करताना प्रशिक्षकाची मदत घेत नाही. रणनीती हा माझ्या खेळाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. माझे यापूर्वीचे प्रशिक्षक रणनीती बनविण्यात तरबेज होते.’ जागतिक क्रमवारीत ८९ व्या क्रमांकावर असणारा सिमोन आपल्या सहयोगी स्टाफशिवाय भारतात आला होता. त्याने नुकतेच आपले प्रशिक्षक यान डी विट, मानसिक प्रशिक्षक रोनक्स लाफेक्स व शारीरिक प्रशिक्षक मिलोस जेलिसाविच यांच्याशी नाते तोडले आहे.तो म्हणाला, ‘कोर्टवरील परिस्थिती माझ्या लवकर लक्षात येते, ही माझी जमेची बाजू आहे. मी या आठवड्यात जसे खेळलो तर मी आणखी चांगली कामगिरी करू शकेन.’ आपल्या कारकिर्दीत राफेल नदाल व रॉजर फेडरर यांना पराभूत करणाºया सिमोन याने अंतिम सामन्यात अ‍ॅँडरसनला पराभूत केले. यापूर्वीचे तीनही सामने अ‍ॅँडरसनने जिंकले होते.अ‍ॅँडरसनला पराभूत करण्यासाठी काही विशेष योजना होती का, असे विचारले असता तो म्हणाला, ‘मी काही गोष्टींमध्ये बदल केला होता. त्याची सर्व्हिस चांगली असल्यामुळे माझा रिटर्न चांगला असला पाहिजे, याकडे मी लक्ष दिले.’